56 इंचाचं तर गोदरेजचं कपाट असतं- रितेश देशमुख याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका (Watch Video)
Riteish Deshmukh (Photo Credits: Twitter)

सध्या राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) हा देखील निवडणुकीच्या धामधूमीत सहभागी झाला आहे. लातूर (Latur) येथील काँग्रेस मेळाव्यात अभिनेता रितेश देशमुख याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. यावेळेस त्याने मोदींच्या 56 इंचाची छाती या वक्तव्याची खिल्ली उडवत म्हटले की, "56 इंचाची छाती म्हणजे किती मोठी असेल. 56 इंचाचं तर गोजरेजचं कपाट असतं." पुढे प्रियंका गांधी यांच्या वक्तव्याची आठवण करुन देत रितेश म्हणाला की," देश चालवायला 56 इंचाची छाती नाही एक चांगलं मन, हृदय लागतं." रितेशच्या या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे.

पहा व्हिडिओ:

तसंच तो पुढे म्हणाला की, "तुमच्या खिशातील मोबाईल हा काँग्रेसने दिला आहे. लातूरमध्ये मोबाईल सेवा देखील साहेबांनी आणली. कम्प्युटर, फेसबुक ही सर्व काँग्रेसची देण आहे. तरी देखील तुम्ही विचारता काँग्रेसने काय दिलं?" त्याचबरोबर भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात काँग्रेसच्या असलेल्या योगदानाची रितेशने यावेळी आठवण करुन दिली.