जेनेलिया व रितेश देशमुख यांचा महराष्ट्र पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात, मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 25 लाखाचे योगदान
Riteish Deshmukh And Genelia Deshmukh Contributed 25 Lakhs In CM Relief Fund (Photo Credits : Twitter)

कोल्हापूर (Kolhapur), सांगली (Sangali) , सातारा (Satara)  परिसरात गेल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसाने नागरिकांची सळो की पळो अशी अवस्था करून टाकली होती. हजारो घरे उध्वस्त होऊन लाखोंचे स्थलांतर करण्यात आले होते. यावेळी एनडीआरएफ, सैन्य, नौदल यांनी युद्धपातळीवर बचावकार्य पार पाडून पुरग्रस्तांची सुटका केली पण ,यामुळे लोकांचा जीव वाचला असला तरी या भागाच्या पुनर्वसनाच्या रूपात आता सरकार समोर मोठे आवाहन आहे. या परिसरातील जनजीवनाची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. या कार्यात आता दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh)यांचे पुत्र व अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh)  व जेनीलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांनी सुद्धा खारीचा वाटा उचलला आहे. रितेश आणि जेनेलियाने आज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांना भेटून CM सहाय्यता निधीसाठी (CM Relief Fund)  25 लाखाची मदत केली आहे. याबाबत फडणवीस यांनी ,माहिती देत दोघांचेही आभार मानले आहेत.

देवेंद्र फडणवीस ट्विट

याशिवाय अनेक मराठी कलाकारांनी सुद्धा या मदतकार्यात पुढाकार घेऊन मुंबई पुण्यातील नाट्यगृहांबाहेर आर्थिक व जीवनावश्यक वस्तूंची मदत स्वीकारणारी केंद्र सुरु केली होती. (Maharashtra Flood 2019: कोल्हापूर, सांगली भागातील पूरग्रस्तांना तुम्ही कशी मदत करू शकाल?)

महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत म्हणून अनेक सामाजिक संस्था, मंदिरे व जनसामान्यांनी सुद्धा पुढाकार घेतला आहे. काही दिवसांपूर्वी शिर्डीच्या साई संस्थानाने सुद्धा पूरग्रस्तांसाठी 10 कोटींची मदत पुढारली होती तर, मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर न्यासाने 11 दिवस पिण्याच्या पाण्याची सोय करून पूरग्रस्तांना हातभार लावला होता. दरम्यान, सांगली येथे पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस यांनी अनेक संस्थांना ही पुरग्रस्त गवे दत्तक घेण्याचे आवाहन केले होते.