Radhakrishna Vikhe Patil सभागृहात डाराडूर झोपले, शिपाई पाचारण
राधाकृष्ण विखे पाटील (विधानपरिषद)

Radhakrishna Vikhe Patil Sleeps In Legislature: राज्य विधिमंडळातील काही सदस्य म्हणजे एक अजब प्रकरणच होऊन बसले आहे. कधी एखादा आमदार कसलीशी पुडी तोंडात टाकताना दिसतो, तर कधी एखादा आमदार विधानपरिषद उपसभापती महोदयांनाच अरेरावीत बोलत निशेध व्यक्त करताना दिसतो. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तर सभागृहात कहरच केला. सभागृहाचे कामकाज सुरु असताना या मंत्री महोदयांना डुलकी लागली. इतकी गाढ के ते चक्क डाराडूर झोपून गेले. सभागृहाचे कामकाच सुरुच होते. उपसभापती निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी त्यांना आवाज दिला. पण महाशय इतके निद्राधीन झाले होते की, त्यांना जागे करण्यासाठी उपसभापतींना चक्क शिपायी पाचारण करावा लागला.

त्याचे झाले असे, राज्यविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विविध विधेयकं चर्चेत आली. कामकाजाच्या नियोजनानुसार महसूल विभागाचे एक विधेयक मांडले जाणार होते. कामाचा उरक होत कामकाज जसजसे पुढे गेले तसे उपसभापती निलम गोऱ्हे यांनी महसूल बिल मांडण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव पुकारले. पण, सभागृहात उपस्थित असूनही विखे पाटील महोदय काही बिल मांडण्यास उभाच राहिले नाहीत.

उपसभापतींनी एकदोन वेळा विखे पाटील यांचे नाव पुकारले मात्र पुढच्या काहीच क्षणांमध्ये त्यांच्या लक्षात आले की, ते झोपले आहेत. आपल्या आसनावर ते इतके गाढ झोपले आहेत की, उठतच नाहीत. अखेर उपसभापतींनी सभागृहातील शिपायाला पाचारण केले, मग हे महोदय झोपेतून खडबडून जागे झाले. शिपायाने डोसलल्यावर ते जागे झाले आणि त्यांनी विधेयक सादर केले. सभागृहात सायंकाळी 5.31 वाजता हा प्रकार घडला.

व्हिडिओ

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्याने उर्वरीत विधेयके मांडून कामकाज पूर्ण करण्यावर सरकार प्रयत्नशील होते. दरम्यान, महसूलमंत्र्यांच्या डुलकीमुळे सत्ताधाऱ्यांची धांदल उडाली. दरम्यान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात अंतिम प्रस्ताव मांडला. वाचकांच्या माहितीसाठी असे की, राधाकृष्ण विखे पाटील हे मुळचे काँग्रेस नेते. काही वर्षांपूर्वी त्यांनी आपले वडील बाळासाहेब विखे पाटील यांच्यासह शिवसेना पक्षात प्रवेश केला. नंतर ते परत काँग्रेसमध्ये परतले. काँग्रेसमध्ये अनेक वर्षे राहिल्यानंतर आणि विधानसभेचा विरोधी पक्षनेता असताना त्यांनी पदाचा राजीनामा देऊन भाजप प्रवेश केला आणि आता ते भाजपमधून आमदार असून मंत्रीसुद्धा आहेत.