महाराष्ट्रात 62 वर्षीय नौदलाच्या एका माजी अधिकाऱ्याला (Retired Navy Officer) मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईत शिवसैनिकांनी शुक्रवारी निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्या घरात घुसून त्यावर हल्ला केला. असे सांगण्यात आले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांचे व्यंगचित्र (Cartoon) व्हॉट्सअॅपवर पाठवल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेच्या 8-10 कार्यकर्त्यांनी या अधिकाऱ्याला मारहाण केली. सेवानिवृत्त नौदल अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून शुक्रवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणात शिवसेनेचे कमलेश कदम यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे. घडलेल्या प्रकारचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
एएनआय ट्वीट -
#UPDATE Four people including Shiv Sena's Kamlesh Kadam arrested so far, in connection with attack on a retired Navy officer today: Mumbai Police
— ANI (@ANI) September 11, 2020
मुख्यमंत्र्यांचे कार्टून फॉरवर्ड केल्यानंतर शर्मा यांना अनेकवेळा कॉल करून घरातून खाली बोलावण्यात आले. जेव्हा ते खाली गेले तेव्हा त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांनी दावा केला आहे की, पोलीसही त्यांना पकडण्यासाठी आले होते. आता या प्रकरणात त्यांची मदत आमदार अतुल भातखळकर करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. रिपब्लिक टीव्हीच्या वृत्तानुसार, या माजी अधिकाऱ्यावर सध्या शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महाआघाडी सरकारच्या या वृत्तीमुळे संतप्त झालेल्या नौदलाच्या अधिकाऱ्यांचे, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जावी असे म्हणणे आहे.
या प्रकरणासंदर्भात माजी अधिकाऱ्याच्या मुलीने मुंबईच्या समता नगर पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आहे. भादंवि अनुसार 325, 143, 147, 149 अन्वये मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंवर गुंडांना संरक्षण दिल्याचा आरोप केला आहे. आता या प्रकरणी ताबडतोब कारवाई करत चौघांना अटक केली आहे.
Extremely sad & shocking incident.
Retired Naval Officer got beaten up by goons because of just a whatsapp forward.
Pls stop this GundaRaj Hon Uddhav Thackeray ji.
We demand strong action and punishment to these goons. https://t.co/g4fQ5xfPYz pic.twitter.com/p1vdP2P0m8
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 11, 2020
राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घटना अतिशय दुःखद असल्याचे ट्वीट केले आहे. ते म्हणतात, ‘एक अतिशय दुःखद आणि धक्कादायक घटना आहे. सेवानिवृत्त नेव्हीच्या अधिकाऱ्याने व्हाट्सएपवर संदेश पाठविल्यामुळे गुंडांनी त्यांना मारहाण केली. उद्धव ठाकरे कृपया हा गुंडाराज थांबवा. आम्ही या गुंडांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करतो.’ (हेही वाचा: भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचा राज्य सरकारला इशारा '.. अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जा')
पहा व्हिडीओ -
अभिनेत्री कंगना राणावत के कार्यालय की तोड़फोड़ करके अपनी मर्दानगी दिखाने वाले सत्ताधारी शिवसेना ने अब सत्ता के मद में एक बुजुर्ग भूतपूर्व नौसेना अधिकारी मदन शर्मा को मारपीट करते हुए उनकी आंख को जबरदस्त चोट पहुंचाई है। मुख्यमंत्री घरबैठे तानाशाही चला रहे है। pic.twitter.com/qF2NVcIN55
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 11, 2020
तर अतुल भातखळकर म्हणतात, ‘अभिनेत्री कंगना रनौत यांच्या कार्यालयाची तोडफोड करून आपली मर्दानगी दाखवणाऱ्या सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने आता, नौदलाच्या एका वयोवृद्ध माजी अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण केली आहे. यामध्ये त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत केली आहे. मुख्यमंत्री घरी बसून हुकूमशाही चालवत आहेत. याबाबत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.’