1996 साली सार्या महाराष्ट्राला हादरवणार्या बालहत्याकांडातील आरोपी रेणूका शिंदे (Renuka Shinde) आणि सीमा गावित (Seema Gavit) यांच्या शिक्षेचा आज निर्णय होणार आहे. दरम्यान या गावित बहिणींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पण फाशी ऐवजी जन्मठेप मिळावी यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरू होते. त्यावरच मुंबई उच्च न्यायालयामध्ये (Bombay High Court) आज निर्णय होणार आहे.
फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीला विलंब झाल्याचं कारण देत त्यांच्या फाशीच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत करावे अशी मागणी गावित बहिणींचे वकील अॅड. अनिकेत वगळ यांच्याकडून करण्यात आले होते. न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी 18 डिसेंबर 2021ला निकाल राखून ठेवण्यात आला आहे.
दरम्यान राज्य सरकार कडून गावित बहिणींनी केलेला गुन्हा आणि त्या पुनर्वसन करण्याच्या पार असल्याचं सांगत फाशीची शिक्षा योग्य असल्याचं म्हटलं आहे. Dombivli Kidnapping Case: डोंबिवलीतून अपहरण केलेल्या 13 वर्षाच्या मुलीची सुटका, 21 वर्षीय तरूणाला अटक .
1996 साली कोल्हापुरात 42 लहान मुलांचं अपहरण करुन त्यापैकी काही लहान मुलांची हत्या केल्याच्या आरोपाखाली रेणुका शिंदे आणि सीमा गावित या बहिणींवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांची आई अंजना गावितही याप्रकरणी जेलमध्ये होती. मात्र काही वर्षांपूर्वी जेलमध्येच तिचं निधन झालं. दरम्यान 5 मुलांच्या हत्या प्रकरणात त्या दोषी सिद्ध झाल्या आहेत.
2001 मध्ये गावित बहिणींना दोषी ठरवण्यात आआले आहे. 2004 मध्ये हायकोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर 2006 मध्ये सुप्रीम कोर्टानेही त्यांची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. 22 ऑक्टोबर 1996 पासून दोघीही जेलमध्ये आहेत. गावित बहिणींनी 2014 मध्ये हायकोर्टात याचिका केली होती.