मुंबई: ड्रग्ज प्रकरणी अटक केलेल्या रिगल महाकालची आज होणार वैद्यकिय तपासणी
Regal Mahakal (Photo Credits: ANI/Twitter)

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput Case) याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटसमोर (Bollywood Drugs Racket) आले. यात अनेक दिग्गज कलाकारांची चौकशी देखील झाली. तसेच या कलाकारांना ड्रग्ज सप्लाय करणा-या अनेकांना NCB कडून अटक झाली. त्यात काही दिवसांपूर्वी मुंबईत रिगल महाकाल (Regal Mahakal)  याला ड्रग्ज सप्लायरला अटक झाली असून त्याला आज वैद्यकिय तपासणीसाठी नेण्यात आले आहे. पुढील रिमांडसाठी त्याला NCB स्पेशल कोर्टासमोर हजर केले जाईल.

मुंबई येथील लोखंडवाला, ओशिवारा परिसरातही एनसीबीने अशी कारवाई करत रिगल महाकाल (Regal Mahakal) याला अटक केली होती. रिगल महाकाल हा मोठा अंमली पदार्थ पुरवठादार (Drug Supplier) असल्याचे सांगितले जाते.हेदेखील वाचा- Sushant Singh Rajput Suicide Case: ड्रग्ज प्रकरणात लोखंडवाला, ओशिवारा परिसरात एनसीबीची छापेमारी; लोखंडवाला येथून रिगल महाकाल नामक व्यक्तीस अटक

दरम्यान, एनसीबीने या आधी कॉमेडियन भारती सिंह हिच्या मुंबई येथील घरावर छापा टाकला होता. तिच्या घरातून काही अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबचिया हिला पोलिसांनी अटक केले होते. परंतू, कोर्टाने त्यांची जामीनावर सुटका केली. दरम्यान, भारती सिंह हिच्यानंतर एनसीबीने अभिनेता आणि मॉडेल अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेंड गेब्रिएला यांच्याही घरावर छापा मारला होता.

याआधी अभिनेत्री सारा अली खान, श्रद्धा कपूर, दीपिका पादुकोण यांना देखील NCB ने चौकशीकरता बोलावले होते. यांच्यासोबत अनेक बॉलिवूड कलाकारांची नावे ड्रग्ज प्रकरणात समोर आली होती.