सुशांत सिंह राजपूत आत्महत्या (Sushant Singh Rajput Suicide Case) प्रकरणात बॉलिवूडमध्ये सुरु असेलला अंमली पदार्थ सेवनाचा धाका पुढे आला. हाच धागा पकडत नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (Narcotics Control Bureau) म्हणजेच एनसीबी (NCB) मोठ्या प्रमाणावर कार्यरत झाली आणि अनेक बॉलिवूड कलाकार, संबंधित व्यक्तींच्या घरावर धाडी पडू लागल्या. अटक होऊ लागली. मुंबई येथील लोखंडवाला, ओशिवारा परिसरातही एनसीबीने अशी कारवाई करत रिगल महाकाल (Regal Mahakal) नामक व्यक्ती अटक केली आहे. रिगल महाकाल हा मोठा अंमली पदार्थ पुरवठादार (Drug Supplier) असल्याचे सांगितले जाते.
प्राप्त माहितीनुसार रिगल महाकाल या व्यक्तीस एनसीबी आज (बुधवार 9 डिसेंबर) कोर्टासमोर हजर करतली. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, रिगल महाकाल हा अनुज केशवानी नामक व्यक्ती ड्रग्ज सप्लाय करत होता. महाकाल याच्याकडून आलेले ड्रग्ज केशवानी पुढे पाठवत असे. याबाबतची माहिती मिळताच NCB पथकाने मिल्लत नगर, लोखंडवाला येथे छापेमारी केली. या वेळी काही प्रमाणात ड्रग्ज, मोठ्या प्रमाणावर रोखड आणि आरोपीला अटक केली. रिगल महाकाल याची चौकशी केल्यानंतर मोठी माहिती हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (हेही वाचा, Top Tweets of 2020: सुशांत सिंह राजपूत, अमिताभ बच्चन पासून चैडविक बोसमैन पर्यंत 'हे' होते सर्वाधिक चर्चेत राहिलेले ट्विट्स)
#SushantSinghRajput death case: NCB arrests an absconding accused Regel Mahakal. He'll be produced before court today.
He used to supply drugs to Anuj Keshwani (another accused) who further supplied it to others. NCB is conducting raids at Milat Nagar, Lokhandwala; drugs seized.
— ANI (@ANI) December 9, 2020
दरम्यान, एनसीबीने या आधी कॉमेडियन भारती सिंह हिच्या मुंबई येथील घरावर छापा टाकला होता. तिच्या घरातून काही अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबचिया हिला पोलिसांनी अटक केले होते. परंतू, कोर्टाने त्यांची जामीनावर सुटका केली. दरम्यान, भारती सिंह हिच्यानंतर एनसीबीने अभिनेता आणि मॉडेल अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेंड गेब्रिएला यांच्याही घरावर छापा मारला होता.