Top Tweets of 2020: सुशांत सिंह राजपूत, अमिताभ बच्चन पासून चैडविक बोसमैन पर्यंत 'हे' होते सर्वाधिक चर्चेत राहिलेले ट्विट्स
Top Tweets 2020 (Photo Credits: Twittera0

Top Tweet in 2020: वर्षाचा शेवटचा डिसेंबर महिना आला की सोशल मिडियावरील वर्षभराचा अनेक महत्त्वाचा अहवाल समोर येतो. यात त्यावर्षी महत्त्वाचे ट्रेंड्स (Trends), ट्विट्स, गुगल सर्च समोर येतात. तसाच अहवाल ट्विटर (Twitter) इंडियाने देखील दिला आहे. वर्षभराचे टॉप ट्विट्स समोर आले आहेत. ज्यात भारतात वर्षभरात कोणते ट्विट सर्वाधिक चर्चेत राहिले ते समोर आले आहे. यात दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसह (Sushant Singh Rajput), विराट कोहली (Virat Kohli), अनुष्का शर्मा (Anushka Sharma), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सारखे सेलिब्रिटीज ट्विटससुद्धा होते. त्याचबरोबर सुशांतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' (Dil Bechara), दीपिका पादुकोणचा चित्रपट 'छपाक' (Chhapaak) चा सुद्धा समावेश आहे.

यंदा कोरोना व्हायरसमुळे सोशल मिडियावर कोरोनाशी संबंधित ट्विट्स जितके ट्रेंड होत गेले त्याहून जास्त ट्रेंड झाले ते दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचे ट्विट्स... सुशांतच्या आत्महत्येने देशभरात नेपोटिज्म विरोधात एक लाट उसळली. तसेच हॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता चैडविक बोसमैनच्या निधनाने देश आणि जगभरात त्याचे ट्विट्स खूप ट्रेंड्स झाले.

तसेच बॉलिवूडचा महानायक कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर त्यांसंबंधीचे ट्विटस देखील खूप चर्चेत राहिले. बिग बी ट्विटकरून ती माहिती दिली. त्यामुळे तो 2020 मधील सर्वात जास्त कोट झालेला ट्विट बनला.

त्याचबरोबर भारतीय क्रिकेटर विराट कोहली ने तो 2021 मध्ये वडिल होणार असल्याचे ट्विट करुन सांगितले. ते ट्विट देखील 2020 मध्ये हिट ठरले. अभिनेता विजयची सेल्फी फोटो 2020 सर्वाधिक रिट्विट झाली. तसेच बॉलिवूडमधील सुशांतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' ट्विट देखील सुपरहिट ठरले. त्यानंतर 'छपाक' हा दुस-या स्थानावर होता. त्यानंतर अजय देवगनचा 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर', तापसी पन्नू चा 'थप्पड़' आणि जान्हवी कपूरचा 'गुंजन सक्सेना' हे अनुक्रमे तिस-या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर होते.