हॉटेल मालकाने चिकन फ्राय बनवून देण्यास नकार दिला म्हणून दारूच्या नशेत दोन जणांनी हॉटेलला आग लावल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील तडके रस्त्यावर रविवारी पहाटे घडली आहे. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. तसेच या घटनेनंतर आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमीदेखील तपासली जात आहे. सुदैवाने, या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे चौकशीतून समोर आले आहे.
शंकर तायडे (वय, 29) आणि सागर पटेल (वय, 19) असे आरोपींची नावे आहेत. हे दोघेही रविवारी पहाटे बेलतरोडी परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवायला गेले. त्यावेळी त्यांनी हॉटेल मालकाना चिकन फ्रायची ऑर्डर दिली. मात्र, हॉटेल मालकांनी त्यांना नकार दिला. यावर संतापलेल्या शंकर आणि सागर या दोघांनी दारुच्या नशेत चक्क हॉटेललाच आग लावली. यानंतर हॉटेल मालकांनी स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली. या घटनेची माहिती होताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे देखील वाचा- Pune: पुण्यात डेटिंग अॅपवर ओळख झालेल्या तरुणाकडून महिलेवर वारंवार बलात्कार; गुन्हा दाखल
याआधी मामलापुरमजवळील केळंबक्कम परिसरात अशीच एक घटना समोर आली होती. या परिसरातील एका हॉटेलमध्ये वकिलांनी मांसाहारी जेवणाची ऑर्डर केली होती. मात्र, त्याला शाकाहारी जेवण वाढण्यात आले होते. यानंतर संबंधित व्यक्तीने रागाच्या भरात हॉटेला आग लावून दिली होती.