
नववर्षाचे आगमन (Happy New Year 2024) आणि थर्टी फर्स्ट जल्लोष (31st Celebration) करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या रेव्ह पार्टीवर (Rave Party) ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. प्राप्त माहितीनुसार, घोडबंदर येथील एका खासगी फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टीचे (Rave Party in Thane) आयोजन करण्यात आले होते. पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेला याबाबत माहिती मिळताच सदर फ्लॅटवर युनिट पाचने धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी 100 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या पार्टीमध्ये गांजा, चरस आणि इतरही काही अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकरणात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रीया रात्री उशीर पर्यंत सुरु होती. ठाणे गुन्हे शाखा उपयुक्त शिवराज पाटील, एसीपी, युनिट पाच आणि युनिट दोन यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केल्याचे समजते.
ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेशन शाखेकडून कारवाई
ठाणे पोलीस गुन्हे अन्वेशन शाखेच्या युनिट पाचने केलेल्याकारवाईत आतापर्यंत 100 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे सर्व तरुण मध्यधूंत आणि नशेत तर्रर्र होते. नववर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र पोलीस सतर्क झाले आहेत. सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला आहे. इतकेच नव्हे तर नागरिकांना नववर्षाचा चांगल्या पद्धतीने आनंद घेता यावा. कायदा व सुव्यवस्था यांचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन होऊ नये यासाठी पोलिसांनी जागोजागी बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच, रेव्ह पार्टी अथवा तत्सम कार्यक्रम, आयोजन यांवरही पोलिसांची बारीक नजर असणार आहे. (हेही वाचा, Nashik Rave Party: इगतपुरी मध्ये रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा; बिग बॉस फेम महिला अभिनेत्रीसह 22 जण ताब्यात)
खासगी फ्लॉटमध्ये रेव्ह पार्टी
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एका खासगी फ्लॉटमध्ये ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये नशेसाठी आवश्यक असणारे बहुतांश पदार्थ उपलब्ध करुन देण्यात आले होते. ज्यामध्ये एमडी, चरस, गांजा, अल्कोहोल यांचा समावेश होता. पोलिसांनी धाड टाकून केलेल्या कारवाईतील तरुणांची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे. त्यासाठी त्यांना सिव्हील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. तसेच, घटनेचा पंचनामाही केला जाणार असल्याचे समजते. (हेही वाचा, Noida Police Bust Rave Party: रेव्ह पार्ट्यांचे आयोजन केल्याबद्दल नोएडा पोलिसांची मोठी कारवाई; बिग बॉस ओटीटी विजेता Elvish Yadav याच्यावर गुन्हा दाखल)
रेव्ह पार्टीमध्ये नेमके काय चालते?
रेव्ह पार्टीमध्ये नेमके काय चालते याबाबत फारशी स्पष्टता नसते. परंतू दावा केला जातो की, रेव्ह पार्टी म्हणजे दारू, ड्रग्ज, संगीत, नृत्य आणि सेक्स यांचे कॉकटेल. या पार्ट्या अतिशय छुप्या पद्धतीने आयोजित केल्या जातात. ज्यांना निमंत्रित केले जाते ते ‘सर्किट’ बाहेरील लोकांना पार्टीबद्दल कळू देत नाहीत. या रेव्ह पार्ट्या ड्रग्ज विक्रेत्यांसाठी सर्वात फायदेशीर व्यवसाय बनल्या आहेत. या पार्ट्यांसाठी मुंबई, पुणे, खंडाळा, पुष्कर आणि दिल्लीच्या आसपासचे क्षेत्र अतिशय अनुकूल मानले जाते. खास करुन या पार्ट्या रात्रीच्या अंधारामध्ये आयोजित केल्या जातात. यामध्ये श्रीमंत लोकांची मुले असतात, असेही बोलले जाते.