टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा ( Ratan Tata ) यांना महाराष्ट्राच्या दुसऱ्या राज्य क्लस्टर विद्यापीठ, HSNC विद्यापीठाद्वारे (HSNC University) मानद डी.लीट द देऊन सन्मान करण्यात आला आहे. रतन टाटा यांनी समाजातील विविध क्षेत्रांमध्ये दिलेल्या अतुलनीय योगादानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. शनिवारी (11 जून) झालेल्या विद्यापीठाच्या विशेष दीक्षांत समारंभात महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी टाटा यांना ही पदवी प्रदान केली.
रतन टाटा यांनी समाजात विकासाचे, शिक्षणाचे आणि उत्थानाचे तत्त्वज्ञान प्रतिबिंबित करतात. त्यामुळे विद्यापीठ त्यांच्या कामाच्या सन्मानार्थ त्यांना डी.लीट. देऊन सन्मानित करत असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे. या कार्यक्रमासाठी दीक्षांत समारोहाला विद्यापीठाचे मुख्य संरक्षक डॉ. निरंजन हिरानंदानी, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, एचएसएनसी बोर्डाचे अध्यक्ष अनिल हरीश व कुलगुरु डॉ हेमलता बागला प्रामुख्याने उपस्थित होते. (हेही वाचा, Bharat Ratna for Ratan Tata: रतन टाटा यांना 'भारतरत्न' देण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली)
ट्विट
दीक्षांत समारोहाला विद्यापीठाचे मुख्य संरक्षक डॉ. निरंजन हिरानंदानी, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, एचएसएनसी बोर्डाचे अध्यक्ष अनिल हरीश व कुलगुरु डॉ हेमलता बागला प्रामुख्याने उपस्थित होते. pic.twitter.com/KRn3yKmYW0
— Governor of Maharashtra (@maha_governor) June 11, 2022
राज्याचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी या वेळी म्हटले की, "रतन टाटा हे केवळ उद्योगपती किंवा कॉर्पोरेट आयकॉन नाहीत तर ते सभ्यता, मानवता आणि नैतिकता या मूल्यांची जोपासना करणारे एक महान मानव आहेत. HSNC विद्यापीठाची मानद डॉक्टरेट स्वीकारून टाटा यांनी आपल्यापैकी प्रत्येकाचा सन्मान केला आहे, असे उद्गारही कोश्यारी यांनी या वेळी काढले.