
देशात महिला अत्याचार आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्काराचे (Rape Case) सत्र थांबायला तयार नाही. देशातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. अशातच जळगाव (Jalgoan) जिल्ह्यातील भुसावळ (Bhusawal) येथून नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. शिक्षणासाठी राहायल्या गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच नातेवाईकांनी अत्याचार केले आहेत. याप्रकरणी पीडित मुलीने बाजारपेठ पोलीस ठाण्यात (Bajarpeth Police Station) तिच्या काका, मामा आणि मावशी विरुद्ध तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी बाललैंगिक अत्याचारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी 17 वर्षाची असून ती मध्यप्रदेशातील रहिवाशी आहे. पीडित मुलगी काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशातून भुसावळ याठिकाणी आपली मावशी प्रमिला संतोष गिरी यांच्याकडे राहायला आली होती. दरम्यान, मावशीच्या पतीने तिच्यासोबत शाररिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. याबाबत पीडिताने तिच्या मावशीला सांगितले. परंतु, तिच्या मावशीने याकडे दुर्लक्ष केले. यामुळे पीडित मुलीने भुसावळमध्ये राहणाऱ्या तिचा मामा संतोष वामनराव भारती याच्या घरी राहायला गेली. तिथे गेल्यानंतर संतोषनेही तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार सलग 7 महिने सुरु होता. त्यानंतर पिडिताने धाडस करून बाजरपेठ पोलीसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरातून संतापजनक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. हे देखील वाचा- Aseri Ghat in Palghar: पालघरमधील अशेरी घाटात पर्यटकांची तोबा गर्दी, कोरोना नियम धाब्यावर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिताने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी संतोष लागीर गिरी (वय, 53), प्रमिला गिरी (वय, 48) आणि संतोष भारती (वय, 38) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप दोघांना अटक केली असून एकाचा शोध घेतला जात आहे. तसेच पोलिसांनी अल्पवयीन मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी जळगाव याठिकाणी असलेल्या शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. यासंदर्भात न्यूज 18 लोकमतने वृत्त दिले आहे.