Raosaheb Danve on Congress: काँग्रेसच्या माडीला शरद पवार यांचा टेकू, रावसाहेब दानवे यांचा बाळासाहेब थोरात यांना टोला
Raosaheb Danve | (Photo Credit : Facebook)

काँग्रेसच्या (Congress) माडीला शरद पवार (Sharad Pawar) यांचा टेकू असल्याचा टोला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना लगावला आहे. भाजप विरोधात सर्व विरोधी पक्षांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यायला हवे असे मत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले होते. एका मुलाखतीदरम्यान काँग्रेसची अवस्था जमीन गेलेल्या जमीनदारासारखी झाली असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले होते. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर रावसाहेब दानवे यांनी टोलेबाजी केली आहे.

काँग्रेसची माडी केव्हाही कोसळू शकते हे शरद पवार यांना माहिती होते. म्हणूनच अनेक वर्षे काँग्रेसच्या हवेतील राहूनही ते बाजूला झाले. परंतू, ते बाजूला झाले असले तरी काँग्रेसची माडी कोसळू नयेत याची ते नेहमी दक्षता घेतात. म्हणूनच त्यांनी गेली अनेक वर्षे काँग्रेसच्या माडीला बाहेरून टेकू दिला असल्याचे रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. तसेच, बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांना काँग्रेसमध्ये म्हणने हस्स्यास्पद असल्याचेही रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Sharad Pawar: मंदिरे उघडण्याची मागणी करणाऱ्या भाजपला शरद पवार यांचा सल्ला)

प्रसारमाध्यमांच्या एका खासगी यूट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी काँग्रेसवर भाष्य केले होते. हे भाष्य करताना जमीन गेलेल्या जमीनदारांसारखी काँग्रेसची अवसथा झाल्याचे मत शरद पवार यांनी नोंदवले होते. यावर आता सर्वांनी भाजप विरोधात काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यायला पाहिजे. तरच भाजपचा पराभव होईल, असे अवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले होते. दरम्यान, थोरात यांच्या वक्तव्याला मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही समर्थन दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष खरेतर मूळ काँग्रेसमधूनच निर्माण झाला आहे. त्यामुळे आपापसातील मतभेद बाजूला ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेस पक्षात विलीन व्हावे ही जी बाळासाहेब थोरात यांनी भूमिका व्यक्त केली आहे. ती रास्त असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले होते.