केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांना कोल्हापूर हिंसाचार (Kolhapur Violence) प्रकरणात नवा दृष्टीकोण आडलून आला आहे. रामदास आठवले यांना कोल्हापूरमध्ये झालेल्या हिंसाचारामागे (Kolhapur Riot) पाकिस्तानचा हात असू शकतो असे वाटते. वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना त्यांनी याबाबत भाष्य केले आहे. रामदास आठवले यांनी म्हटले आहे की, कोल्हापूरमनध्ये झालेल्या हिंसाचारामागे पाकिस्तानचा हात असू शकतो. पोलिसांनी त्या दृष्टीकोणातून तपास करायला हवा. रामदास आठवले यांच्या या नव्या तर्कामुळे कोल्हापूर हिंसाचार प्रकरणाची व्याप्ती वाढल्याची चर्चा आहे.
रामदास आठवले यांनी म्हटले की, कोल्हापूरमध्ये औरंगजेब आणि टिपू सुलतान यांच्या प्रतिमेचा कथीत वापर केल्याच्या विरोधात झालेल्या आंदोलनात हिंसाचार झाला. काही स्थानिक लोकांनी या प्रतिमा वापरुन स्टेटस लावल्याचेही आठवले म्हणाले. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करुन सत्य पुढे आणावी असे अवाहनही त्यांनी केले. रामदास आठवले यांच्या कोल्हापूर हिंसाचाराकडे बघण्याच्या नव्या दृष्टीकोणाची सध्या राजकीय आणि कोल्हापूरच्या सामाजिक वर्तुळात चर्चा आहे. (हेही वाचा, Kolhapur Riot: कोल्हापूर दंगल प्रकरणी 36 जणांना अटक; सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, बेकायदेशीर जमाव जमविण्याचा आरोप)
दरम्यान, कोल्हापूर शहरात झालेली दंगल आणि जिल्ह्यतील तणाव प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी (Kolhapur Police) आतापर्यंत 36 जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली आहे. आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना एसपी पंडित यांनी सांगितले की, 36 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत. घडलेल्या प्रकरणात एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्ह्यात सुमारे 300 ते 400 आरोपी आहेत. अटक करण्यात आलेले 36 जण काल ताब्यात घेण्यता आलेले आहेत.
काय आहे प्रकरण?
शिवराज्याभिषेक दिनीन काही तरुणांनी मोबाईलवर औरंगजेबाचे स्टेटस ठेवले होते. त्यावरुन कोल्हापूरमध्ये तणाव निर्माण झाला. त्यातच काही हिंदुत्त्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक दिली. दरम्यान, 7 जून रोजी कोल्हापूरातील शिवाजी चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर जमाव जमला. त्यातून या जमावाने पोलिसांसोबत हुज्जत घातली. आक्रमक जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यानंतर या जमावाने कोल्हापूरमध्ये तोडफोड केली.