Kolhapur Riot | (Image Credit - Ani Twitter)

कोल्हापूर (Kolhapur) शहरात पुकारलेला बंद आणि शिवाजी चौकात झालेले आंदोलन. पुढे या आंदोलनाला लागलेले हिंसक वळण (Kolhapur Riots) यावरुन पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. कोल्हापूर शहरात झालेली दंगल आणि जिल्ह्यतील तणाव प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी (Kolhapur Police) आतापर्यंत 36 जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली आहे. आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना एसपी पंडित यांनी सांगितले की, 36 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत. घडलेल्या प्रकरणात एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्ह्यात सुमारे 300 ते 400 आरोपी आहेत. अटक करण्यात आलेले 36 जण काल ताब्यात घेण्यता आलेले आहेत.

पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पुढे सांगितले की, कोल्हापूरातील घटनेला ज्या

आरोपी तरुणांनी मोबाईल स्टेटस ठेवल्याचे सांगितले जात आहे. त्यातील पाच आरोपी हे अल्पवयीन आहेत. या सर्वांनी मोबाईल स्टेटस कॉपी करुन आपल्या मोबाईलवर ठेवल्याची प्राथमिक माहिती आहे. हे सर्व मोबाईल ताब्यात घेण्यात आले आहेत. मात्र, आरोपींनी ज्या मोबाईल अॅपवर हे स्टेटस ठेवले ते अॅपच आोरपींनी मोबाईलमधून काढून टाकले आहे. त्यामुळे त्यातील डेटा रिकव्हर करण्याचे काम सध्या सुरु असल्याचेही ते म्हणाले. (हेही वाचा, Kolhapur News: कोल्हापूरात 19 जूनपर्यंत जमावबंदीचे आदेश, इंटरनेट सेवा सुरळीत)

ट्विट

दरम्यान, आज पुन्हा एकदा नव्याने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहेत. त्या आधारे काही नवीन आरोपी समोर येतील. त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. शहरातील परिस्थिती सध्या पूर्वपदावर आली आहे. काल जे आरोपी ताब्यात घेण्यात आले त्या 36 पैकी 3 आरोपी हे अल्पवयीन आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत. त्यांना बालन्यायालयात हजर केले जाणार आहे, अशी माहिती एसपी महेंद्र पंडित यांनी दिली.

ट्विट

व्हिडिओ

काय आहे प्रकरण?

शिवराज्याभिषेक दिनीन काही तरुणांनी मोबाईलवर औरंगजेबाचे स्टेटस ठेवले होते. त्यावरुन कोल्हापूरमध्ये तणाव निर्माण झाला. त्यातच काही हिंदुत्त्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक दिली. दरम्यान, 7 जून रोजी कोल्हापूरातील शिवाजी चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर जमाव जमला. त्यातून या जमावाने पोलिसांसोबत हुज्जत घातली. आक्रमक जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यानंतर या जमावाने कोल्हापूरमध्ये तोडफोड केली.