काँग्रेस नेते राजीव सातव यांची प्रकृती खालावली, न्युमोनियाचा संसर्ग झाल्याने व्हेंटिलेटरवर
Rajeev Satav (Photo Credits-Facebook)

Rajeev Satav Health Update: काँग्रेसचे नेते राजीव सातव यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यासाठी सातव यांना पुणे येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र तेव्हा त्यांची प्रकृती बिघडत त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले. परंतु काही दिवसांनी प्रकृती सुधारण्यासह त्यांनी कोरोनावर मात ही केली. पण आता पुन्हा एकदा राजीव सातव यांची प्रकृती खालावली आहे. यावेळी त्यांना न्युमोनियाचा संसर्ग झाल्याने पुन्हा व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले आहे. पुण्यातील जाहांगीर रुग्णालयात सातव यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

सातव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे दिसून आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच व्हेंटिलेटर शिवाय ते श्वास ही घेऊ शकतात त्यामुळे डिस्चार्ज देण्यात काहीच हरकत नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले होते. परंतु सातव यांना झालेला न्युमोनियाचा संसर्ग तसाच राहिला. त्यामुळेच आता सातव यांची प्रकृती अधिक खालावली गेली आहे. सातव यांच्या प्रकृतीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सुद्धा लक्ष ठेवून आहेत.(कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे जालन्यात लहान मुलांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी)

तर 22 एप्रिलला राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. याबद्दल त्यांनी ट्विट करत माहिती सुद्धा दिली. त्यांनी ट्विट मध्ये म्हटले की, कोरोनाची हलकी लक्षणे दिसून आल्याने चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे माझ्या संपर्कात आलेल्यांनी सुद्धा कोरोनाच्या नियमांचे पालन करावे. त्यानंतर 25 एप्रिलला सातव यांना आयसीयु मध्ये हलवण्यात आले. तर काही तक्रारींमुळे त्यांना नंतर व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. प्रकृती सुधारत असल्याचे दिसून आल्यानंतर सातव यांची 10 मे रोजी कोरोनाची चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली. मात्र आता सातव यांची पुन्हा प्रकृती खालावली गेली आहे.