मध्य रेल्वेमार्गावर पहिली राजधीनी एक्सप्रेस (Rajdhani Express) शनिवार (19 जानेवारी) पासून धावणार असल्याची शक्यता रेल्वेच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. तर काही रेल्वेमार्गावर अडचणी आल्यास ती 26 जानेवारी पासून सुरु करण्यात येणार आहे.
राजधानी एक्सप्रेस 15 बोगी असणार आहेत. तसेच सीएसटी स्थानकावरुन नाशिक मार्गाने हजरत निझामुद्दिन (दिल्ली) पर्यंत ही रेल्वेसेवा प्रवाशांसाठी सुरु करण्यात येणार आहे. तर कल्याण-नाशिक-जळगाव-भोपाळ-झाशी जंक्शन- आग्रा या मार्गाने राजधानीचे मार्गाक्रमण होणार आहे. प्रत्येक शनिवार आणि बुधवारी ही रेल्वे सेवा प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. तर मंगळवारी आणि रविवारी दिल्लीहून मुंबईच्या दिशेला रवाना होणार आहे.
दिल्ली (Delhi) आणि मुंबई (Mumbai) ला जोडणारा नाशिक मार्ग हा रेल्वेमार्गामधील दुवा असणार आहे. तसेच रेल्वे बोर्डाकडून मुंबई-दिल्ली रेल्वे सुविधेसाठी मंजुरी देण्यात आली आहे. या रेल्वेमुळे मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, जळगाव येथील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.