राज ठाकरे यांना धक्का? एक्झीट पोल्स अंदाजानुसार मनसे रेल्वे इंजिन यार्डात?
Raj Thackeray | (Photo Credits: Twitter)

Maharashtra Assembly Election 2019 Exit Polls Result:  महाराष्ट्र विधानसभा निवडणू निकाल काय लागू शकतील याचा अंदाज वर्तवणारे विविध वृत्तवाहीण्या आणि संस्थांचे एक्झिट पोल आज (21 ऑक्टोबर) जाहीर झाले. एक्झिट पोल्सनी वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात भाजप-शिवसेना (BJP-Shiv Sena) महायुतीचे सरकार पुन्हा येईल असे चित्र आहे. तर विरोधात असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (Congress-NCP) आणि मित्रपक्षांच्या आघाडीला पुन्हा एकदा विरोधात बसावे लागणार आहे. दरम्यान, एक्झिट पोल्सनी (Exit Polls 2019) राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेबाबत मात्र फारसे समाधानकारक अंदाच वर्तवले नाहीत. एक्झिट पोल्सनी मनसेला आतापर्यंत एकही जागा मिळेल असा अंदाज वर्तवला नाही. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

टिव्ही 9, टाइम्स नाऊ, इंडिया टुडे, एबीपी माझा- सी व्होटर यांच्यासह इतर सर्वच एक्झिट पोल्सनी मनसेला एकही जागा दिली नाही. विशेष म्हणजे काही एक्झिट पोल्सनी मात्र प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला एक ते दोन जागा दिल्या आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनसेपेक्षा अगदीच नव्या असलेल्य वंचित बहुजन आघाडीला यश मिळताना दिसत आहे. (हेही वाचा, भाजप-शिवसेना नेतृत्व टेन्शनमध्ये? मतदानाचा टक्का घटला, बंडखोर आडवणार युतीच्या विजयाची वाट? काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस करणार सत्तावापसी?)

राज ठाकरे हे नेहमीच आपल्या हटके संकल्पनांसाठी चर्चेत असतात. लोकसभा निवडणूकीत राज ठाकरे यांनी प्रचारात 'लाव रे तो व्हिडीओ' असे म्हणत वादळ निर्माण केले. परंतू, मनसेचा एकही उमेदवार लोकसभा निवडणुकीत उभा नसल्याने मनसेच्या मतदाराचे मतदान नेमके कोणाला गेले हे समजूच शकले नाही. विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी ही चूक दुरुस्त करत आपले उमेदवार उभे केले. मात्र, एक्झिट पोल्सनी वर्तवलेल्या निकालात राज ठाकरे यांना एकही जागा मिळाली नाही.

महत्त्वाचे म्हणजे या वेळी नेहमीप्रमाणे राज ठाकरे यांनी मतदारांकडे हटके मागणी केली होती. ही मागणी म्हणजे सक्षम विरोधी पक्ष म्हणू काम करण्यासाठी मनसेला संधी द्या. राज ठाकरे यांचे हे अवाहन प्रत्यक्ष मतदारांना किती भावते हे निकाला दिवशीच कळणार आहे. एक्झिट पोल्सचे अनेक अंदाज या आधीच्या निवडणुकीत फोल ठरले आहेत. या निवडणुकीत काय घडते हे लवकरच समजेल.