Live
Raj Thackeray ED Enquiry Live Updates: राज ठाकरे ईडी कार्यालयाबाहेर पडले, कुटुंबासह 'कृष्णकुंज' कडे रवाना
महाराष्ट्र
Dipali Nevarekar
|
Aug 22, 2019 08:26 PM IST
कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी आज ईडी च्या कार्यालयात मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची चौकशी होणार आहे. या प्रकरणामध्ये राजन शिरोडकर आणि मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांची चौकशी झाल्यानंतर आता आज ईडीच्या ठाणे कार्यालयात राज ठाकरे हजेरी लावणार आहेत. रविवार (18 ऑगस्ट ) दिवशी ईडी कडून राज ठाकरेंना समन्स पाठवण्यात आल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. आता आज राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील कृष्णकुंज या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. दादर परिसरासह मुंबई, ठाणे परिसरात पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली असून आज सकाळी मनसे प्रवक्ता संदीप देशपांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान मनसे कार्यकर्त्यांना ईडी कार्यालयाजवळ न जमण्याचे तसेच शांत राहण्याचे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले आहे. काल ठाण्यात एका मनसे कार्यकर्त्याने राज ठाकरेंच्या समर्थनार्थ आत्मदहन करून आयुष्य संपवल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून राज ठाकरे यांची पाठराखण, ईडीच्या नोटीशीबद्दल काय म्हणाले पाहा
दादर परिसरात 'कोहिनुर स्क्वेअर' या भव्य प्रकल्पातील गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने राज ठाकरे कोहिनुर समूहाचे उन्मेष जोशी व राज यांचे भागीदार राजन शिरोडकर यांना नोटीस बजावली आहे. या नोटीशीनंतर ईडीने उन्मेष जोशी यांची सोमवार, 19 ऑगस्ट 2019 रोजी सखोल चौकशी केली. ही चौकशी सुमारे साडेसात तास सुरु होती. उन्मेष जोशी यांच्यासोबत राजन शिरोडकरही उपस्थित होते. राज ठाकरे यांना ईडीने 22 ऑगस्ट ही तारीख दिली आहे. त्यामुळे आज राज ठाकरे हे ईडीच्या कार्यालयात चौकशीला सामोरे जातील.