महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा आज (14 जून) 54 वा वाढदिवस आहे. मात्र पुढील आठवड्यात राज ठाकरेंच्या हिप बोन वर होणार्या एका शस्त्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर यंदा राज ठाकरे वाढदिवसाच्या सेलिब्रेशनपासून थोडे दूर आहेत. काही दिवसांपूर्वी ट्वीटर वर एक ऑडिओ क्लिप शेअर करत आपण कोविड 19 चा धोका आणि त्यामुळे शस्त्रक्रियेवर होणारा परिणाम पाहता यंदा वाढदिवसादिवशी कुणाला भेटणार नसल्याचं जाहीर केलं होतं. पण मनसैनिकांनी 14 च्या रात्री मनसेप्रमुखांचा बर्थ डे थोडा दुरावा ठेवत पण सार्वजनिक स्वरूपात साजरा केलाच.
14 जूनच्या रात्री मध्यरात्री शिवाजी पार्क जवळ असलेल्या राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी काही मनसैनिक जमले होते. त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी काही वेळासाठी राज ठाकरे देखील गॅलेरीमध्ये आले. त्यांना पाहून जमलेल्या मनसैनिकांनीही एकत्र 'हॅप्पी बथडे' गायलं आणि राज ठाकरेंचा बर्थ डे साजरा केला. नक्की वाचा: Raj Thackeray's Appeal: राज ठाकरे यांचे मनसे कार्यकर्त्यांना अवाहन, 'वाढदिवसाला मला भेटू नका'; ऑडीओ क्लिप शेअर करत सांगितले कारण .
दरम्यान 1 जूनला राज ठाकरेंच्या हिप बोन वर वांद्राच्या लीलावती हॉस्पिटल मध्ये शस्त्रक्रिया होणार होती पण शस्त्रक्रियेपूर्वी होणार्या चाचण्यांमध्ये राज ठाकरेंच्या शरीरात कोविडचा डेड सेल असल्याचं निष्पन्न झालं आणि ही शस्त्रक्रिया पुढे गेली. आता येत्या काही दिवसांत राज ठाकरेंवर ही शस्त्रक्रिया होणार असल्याने पुन्हा संसर्गाचा धोका टाळण्यासाठी यंदा कुणीच भेटण्यासाठी गर्दी करू नये. जिथे असाल तिथूनच शुभेच्छा द्या असे आवाहन त्यांनी केले आहे.