महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 (Maharashtra Vidhan Sabha Elections) च्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या प्रचार सभांचा धडाका सुरू झाला आहे. आज भांडूप, विक्रोळी आणि घाटाकोपर विधानसभा मतदार संघात प्रचार सभा घेताना राज्याच्या विधानसभेत मनसेला प्रबळ विरोधी पक्ष म्हणून पाठवा असं म्हणत त्यांनी मतांचा जोगवा मागितला आहे. दरम्यान घाटकोपरमध्ये बोलताना 'आमच्या होता तोपर्यंत 'राम' होता भाजपामध्ये गेल्यानंतर 'रावण' झालाय' असं म्हणत आमदार राम कदम यांच्यावर हल्लाबोल केला आहे. महिलांबाबत आक्षेपार्ह विधान करूनही राम कदम यांना उमेदवारी पुन्हा कशी मिळते? असं म्हणर राम कदम (Ram Kadam) यांच्यावर टीका केली आहे. भाजपच्या 'रामा'कडून पुन्हा एकदा वादग्रस्त 'कदम'; मतदार यादीत नाव नोंदण्यासाठी हमर, बेन्टलीचे आमिष
राज ठाकरे यांनी आज सभांमध्ये बोलताना ईडी चौकशीला घाबरत नाही याचा पुनरूच्चार केला आहे. गैर व्यवहार कधीच केला नाही म्हणूनच त्यांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांना जाब विचारू शकतो. तसेच अमित शहा महाराष्ट्रात येऊनही शेतकरी आत्महत्यांच्या विषयावर काहीच का बोलत नाही? असा प्रशन राज ठाकरे यांनी विचारला आहे.
मोदी सरकारच्या नोटाबंदी आणि जीएसटी या दोन चूकीच्या निर्णयामुळे देशावर आर्थिक संकट ओढावल्याचेही राज ठाकरे म्हणाले आहेत. पीएमसी बॅंक प्रकरण, बुलेट ट्रेन, मोठ्या कंपन्यांमधील नोकर कपात यांच्यासोबतच सरकार समान्यांच्या अनेक लहान सहान समस्या देखील दूर करण्यास असमर्थ ठरलं असं म्हणत मतदार म्हणून जनतेला गृहीत धरणार्या या सरकारला जाब विचारणारा विरोधी पक्ष म्हणून मनसेला साथ द्या. योग्य वेळ आली की आम्ही तुमच्याकडे सत्ता देखील मागू असं आवाहन राज ठाकरे यांनी मतदारांना केलं आहे.
घाटकोपर मतदार संघामध्ये भाजपाने प्रकाश मेहता यांना डावलून पराग शहा यांना उमेदवारी दिल्याने भाजपामध्ये फूट पडली आहे. तर राम कदम यांना भाजपाने पुन्हा उमेदवारी जाहीर केल्याने स्थानिक शिवसैनिकांनी आपली नाराजी काही दिवसांपूर्वी पोस्टरच्या माध्यमातून व्यक्त केली होती. उद्धव ठाकरे आम्हांला माफ करा यंदा आमचं मत मनसेला अशा प्रकारची पोस्टर काही दिवसांपूर्वी घाटकोपरमध्ये झळकली होती. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: भाजपा कार्यकर्त्यांचा पराग शहा यांच्या गाडीवर हल्ला; प्रकाश मेहता, विनोद तावडे यांचं तिकीट कापल्याने कार्यकर्ते आक्रमक
महाराष्ट्रात 288 विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर 24 ऑक्टोबरला मतमोजणी पार पडेल.