आज विधानसभा निवडणूक 2019 (Vidhan Sabha Election) साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. सकाळी भाजपाने (BJP) चौथी उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये मुंबई मधील विद्यमान आमदार विनोद तावडे आणि प्रकाश मेहता (Prakash Mehta) सह बड्या आमदारांचं तिकीट नाकरलं आहे. त्यानंतर आता भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पराह शाह यांना भाजपाने तिकीट जाहीर केल्याने त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. एकनाथ खडसे ते राज पुरोहित; भाजपाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये कापली या 7 बड्या नेत्यांची तिकीटं
प्रकाश मेहता सहा वेळेस आमदार होते मात्र यंदा त्यांना तिकीट नाकारल्याने भाजपामध्ये फूट पडली आहे. पराग शहा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झाले तेव्हा हा प्रकार झाला. गाडीचा चक्काचूर करण्यात आला आहे. यानंतर प्रकाश मेहता यांनी भाजपा कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. प्रकाश मेहता गाडीवर चढून कार्यकर्त्यांना आवाहन करताना दिसले.
ANI Tweet
Mumbai: Car of BJP candidate from Ghatkopar East,Parag Shah was vandalized allegedly by supporters of six term sitting BJP MLA Prakash Mehta(who was denied a ticket). #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/7cbarWjdpx
— ANI (@ANI) October 4, 2019
प्रकाश मेहता यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करा असा सल्ला देखील कार्यकर्त्यांना दिला आहे. मुंबई भाजपामध्ये प्रकाश मेहता यांचं मोठं नाव आहे. प्रकाश मेहता यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीला सुरूवात केली आहे.