BJP (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 (Maharashtra Vidhan Sabha Elections) साठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. सध्या सत्तेमध्ये असलेल्या भाजपा-शिवसेना-रिपाई या महायुतीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर यंदा शिवसेना, भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात आयारामांनी एंट्री केली. त्यामुळे यंदा तिकीट वाटपाच्या वेळेस पक्षानिष्ठ कार्यकर्ते, नेते की नव्याने दाखल झालेली दिग्गज व्यक्तिमत्त्व यांच्यापैकी कुणाला तिकीट द्यावं हा प्रश्न सोडवताना पक्ष प्रमुखांच्या नाकी नऊ आले होते. भाजपा यंदा 150 जागांवर निवडणूक लढणार आहे. त्यांनी चार याद्यांमधून आपले उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र यादरम्यान काही विद्यमान आमदार, बडे नेते यांची तिकीटं कापण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. यामध्ये राज पुरोहित, विनोद तावडे, एकनाथ खडसे यांच्यासह 7 मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: 'भाजपा' च्या चौथ्या उमेदवार यादीमध्ये रोहिणी खडसे यांची वर्णी; विनोद तावडे, प्रकाश मेहता यांना डिच्चू

भाजपाने विधानसभा निवडणूक 2019 मध्ये कुणाची तिकिटं कापली?

राज पुरोहित

विनोद तावडे

चंद्रशेखर बावनकुळे

प्रकाश मेहता

एकनाथ खडसे

बाळासाहेब सानप

चरण वाघमारे

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून एकनाथ खडसे ऐवजी त्यांची मुलगी रोहिणी खडसेंना तिकीट देण्यात आले आहे. कुलाबामधून रामराजे निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर यांना तिकीट दिले आहे. तर बोरिवलीमधून विनोद तावडे यांच्याऐवजी सुनिल राणे यांना तिकीट देण्यात आले आहे. नाशिक पूर्व मधून बाळासाहेब सानप यांच्याऐवजी राहुल डिकळे तर चरण वाघमारे ऐवजी प्रदीप पडोले यांना देण्यात आली आहे.

सध्या अस्तित्त्वामध्ये असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर दिवशी संपणार आहे. आता 288 विधानसभा जागांवर 21 ऑक्टोबरला निवडणूक आणि 24 ऑक्टोबरला मतामोजणी होणार आहे.