महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: 'भाजपा' च्या चौथ्या उमेदवार यादीमध्ये रोहिणी खडसे यांची वर्णी; विनोद तावडे, प्रकाश मेहता यांना डिच्चू
BJP Logo (Photo Credits: IANS)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 (Maharashtra Vidhan Sabha Election)  साठी भाजपाने चौथी उमेदवार यादी आज (4 ऑक्टोबर) जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये रोहिणी खडसे (Rohini Khadse)  यांना मुक्ताईनगरमधून तिकीट जाहीर करण्यात आलं आहे. मात्र विनोद तावडे (Vinod Tawade), प्र्काश मेहता, राज पुरोहित  यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या चौथ्या यादीमध्ये 7 नावांचा समावेश करण्यात आला आहे.

विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता यांचे नाव चौथ्या यादीमध्येही जाहीर न झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. विनोद तावडे हे महाराष्ट्र सरकारमध्ये सांस्कृतिक मंत्री आहेत. मात्र चौथ्या यादीमध्ये भाजपाने एकनाथ खडसे ऐवजी त्यांच्या मुलीला तिकीट दिले आहे.   (हेही वाचा: Maharashtra Assembly Elections 2019: विधानसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, दिग्गजांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी)

भाजपची चौथी यादी 

बोरीवली - सुनील राणे

घाटकोपर पूर्व - पराग शाह

कुलाबा - राहुल नार्वेकर

तुमसर - प्रदीप पडोळे

मुक्ताईनगर - रोहिणी खडसे

काटोल - चरणसिंग ठाकूर

नाशिक पूर्व -  राहुल ढिकले

ANI Tweet  

राज्यात विधानसभा निवडणूकीसाठी भाजपासोबत शिवसेना पक्षाने युती केली आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. काही दिवसांपासून एकनाथ खडसे नाराज होते. त्यांनी तिकीट जाहीर होण्याआधीच आपला उमेदवारी अर्ज भरला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज त्यांचा उमेदवारी अर्ज नागपूरमधून भरणार आहेत.

महाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान तर 24 ऑक्टोबरला मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे.