BJP | (Photo credit: Archived, edited, representative images)

BJP Candidates Second List: विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) आज (2 ऑक्टोबर 2019) आपली दुसरी यादी जाहीर केली. या यादीत एकूण 14 उमेदवारांचा समावेश आहे. भाजपने काल (1 ऑक्टोबर 2019) एकूण 125 उमेदवारांची यादी जाहीर केली व ही यादी अनेकांसाठी धक्कादायक ठरली होती. आज प्रसिद्ध करण्यात आलेल्या दुसऱ्या यादीमध्येही अनेक मान्यवरांचा समावेश नाही. भाजपच्या पहिल्या यादीत पक्षाच्या विद्यमान 12 आमदारांसह ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता यांसारख्या मंत्र्यांचा समावेश नव्हता, आता दुसऱ्या यादीतही या नेत्यांचा समावेश नाही.

भाजप उमेदवारांची दुसरी यादी इथे पाहा -

भाजपमध्ये इतर पक्षातून आयात झालेल्या आयारामांचा भाजपच्या पहिल्याच यादीत समावेश होता. त्यामुळे भाजपच्या दुसऱ्या यादीत कोणाकोणाला संधी मिळते याबाबत प्रचंड उत्सुकता होती. दुसऱ्या यादीतही हीच परिस्थिती आहे. भाजपने आतापर्यंत 139 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, अजून भाजपची एक यादी येणे बाकी आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची पहिल्या यादीतील नावे इथे पाहा

या यादीमधील महत्वाची गोष्ट म्हणजे, बारामती येथून राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या विरोधी गोपीचंद पडाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीमधून भाजप प्रवेश केलेल्या नमिता मुंदडा यांना दुसऱ्या यादीत उमेदवारी जाहीर झाली आहे. अजूनही निलेश राणे यांचा पक्षप्रवेश आणि उमेदवारी याबाबत काहीही निर्णय झाला नाही.

(हेही वाचा, शिवसेना उमेदवारांची पहिली यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा)

दरम्यान, या वेळी विधानसभा निवडणूक प्रक्रियेत महाराष्ट्रात 8 कोटी 94 लाख मतदार मतदान करतील. महाराष्ट्रात 288 मतारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडेल. 27 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 4 ऑक्टोबर हा निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम दिवस असेल. 7 ऑक्टोबर पर्यंत दाखल केलेले आणि छाननीमध्ये टिकलेले उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर 21 ऑक्टोबर या दिवशी प्रत्यक्ष मतदान तर, 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.