Maharashtra Rain Alert: राज्यात अतिवृष्टीचा इशारा; पुणे, रत्नागिरीसह अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Photo Credit ; X

गतवर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून (Monsoon) लवकर भारतात दाखल झाला.  मात्र, महाराष्ट्रातील काही भागात पोहोचल्यानंतर मान्सूनचा वेग मंदावला आहे. राज्यात पुढील 4 दिवस दक्षिण कोकणासह राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोमवार, मंगळवार आणि बुधवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तसंच सातारा, कोल्हापूर आणि पुण्यालाही ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. पावसाची हजेरी, शेतकरी सुखावला छत्रपती संभाजीनगर शहरात जोरदार पाऊस झाला आहे. तसंच ग्रामीण भागात देखील पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. यामुळे पेरणीच्या कामांना वेग येणार आहे. (हेही - Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्या संमिश्र हवामान, ढगाळ वातावरणासोबत हवेत गारवा)

पाहा पोस्ट -

पिंपरी चिंचवडमधील आकुर्डी परिसरात तुफान पाऊस झालाय. आकुर्डी परिसरात रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही घरात पाणी शिरल्याच्या घटनाही घडल्या आहेत. शहरात विविध भागात दुपारपासून पाऊस सुरू होता. अतिवृष्टीमुळे चिंचवड स्पाईन रोडवर गाड्या पाण्यात बुडाल्याचे चित्र आहे.

अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरूवात झालीय. पावसामुळे अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचलंय. यामुळे शेताला शेततळ्याचे स्वरूप प्राप्त झालंय. दरम्यान पेरणी झालेल्या शेतामध्ये पाणी साचल्यानं शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालंय. तर काही ठिकाणी पावसामुळे पेरण्या खोळबल्यात आहेत.