रायगड: महाड मध्ये तारिक गार्डन (Tariq Garden) ही रहिवासी संपूर्ण कोसळल्याने दुर्घटनेमध्ये सध्या मातीच्या ढिगार्याखाली अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे. दरम्यान आता या प्रकरणामध्ये रायगड पोलिसांनी (Raigad Police) 5 व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. या दुर्घटनेशी संबंधितांवर कठोर कारवाईचे आदेश दिले राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. दरम्यान पहाटे त्यांनी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्यासोबत घटनास्थळाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला आहे. यावेळी स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले देखील उपस्थित होते.
तारिक गार्डन इमारतीतील 41फ्लॅटमधील 97 व्यक्तींपैकी 78 व्यक्ती सुखरूप आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 19 व्यक्तींचा शोध व बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. Mahad Building Collapse: इमारतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे, दोषींवर कारवाई करण्यात येईल - एकनाथ शिंदे.
ANI Tweet
Maharashtra: Raigad Police registers case against five people over Raigad Building collapse.
At least two people have lost their lives and 18 are still feared trapped at the incident site. Latest visuals of search & rescue operation by National Disaster Response Force (NDRF). pic.twitter.com/0EZouiNMau
— ANI (@ANI) August 25, 2020
काल (24 ऑगस्ट) संध्याकाळी अचानक इमारतीचे पिलर कमकुवत होऊन कोसळत असल्याचं रहिवाश्यांच्या लक्षात आल्यानंतर अनेकांनी वेळीच घराबाहेर पडण्याचा मार्ग स्वीकारला. बघता बघता संपूर्ण इमारत जमीनदोस्त झाल्याची घटना उपस्थितांनी पाहिली. यानंतर तात्काळ अग्निशमन, रूग्णवाहिका, पोलिस प्रशासन, एनडीआरएफ पथक दाखल झाले आहे.
दरम्यान महाड दुर्घटनेमध्ये मृतांच्या परिवारांप्रती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेकांनी संवेदना प्रकट केल्या आहेत.