NDRF at Raigad Building Collapse Rescue Operation | Photo Credits: Twitter/ ANI

रायगडमधील महाड (Mahad)  येथील तारिक गार्डन (Tariq Garden) इमारतीच्या दुर्घटनेला आता 20 तासांपेक्षा अधिकचा काळ उलटला आहे. दरम्यान एनडीआरएफच्या पथकाकडून अजूनही बचावकार्य आणि शोधमोहिम सुरू आहे. अशामध्ये आता 9 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर एका 4 वर्षीय चिमुकल्याची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. Raigad Building Collapse Rescue Operation: तारीक गार्डन इमारत दुर्घटनेनंतर 19 तासांनी चार वर्षीय मुलगा मोहम्मद बांगी ची NDRF पथकाकडून सुखरूप सुटका(Watch Video).  

दरम्यान आज सकाळी तारिक गार्डन इमारतीतील 41फ्लॅटमधील 97 व्यक्तींपैकी 78 व्यक्ती सुखरूप आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 19 व्यक्तींचा शोध व बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली होती. त्यानुसार आता मृतदेहांचा आकडा समोर येण्यास सुरूवात झाली आहे.

ANI Tweet

काल संध्याकाळी 6.30 च्या सुमारास महाड मधील तारीक गार्डन ही 5 मजली इमारत कोसळल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. इमारतीचे पिलर कोसळताना प्रत्यक्षदर्शींनी पाहिले आहे. यानंतर राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाला भेट देऊन निकृष्ट दर्जाचे बांधकाम असून दोषींवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.