Rahul Solapurkar | (Photo Credit- Facebook)

छत्रपती शिवाजी महाराज ( Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल अवमानकारक विधान करणारे अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी अखेर भांडारकर संस्थेच्या विश्वस्त पदाचा राजीनामा (Rahul Solapurkar Resigned) दिला आहे. त्यांच्या वक्तव्यावरुन राज्यभर संताप (Rahul Solapurkar Controversial Statement) व्यक्त होत आहे. अनेक शिवप्रेमींनी त्यांच्या पुणे येथील घरावरही मोर्चा काढला होता. त्यांनी आपल्या पदाचा राजनामा द्यावा आणि महाराष्ट्राची जाहीर माफी मागवी, अशी मागणी शिवप्रेमींकडून केली जात होती. त्याच वेळी छत्रपती शिवरायांचे थेट वंशज उदयनराजे भोसले हेसुद्धा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यांनी तर जाहीर पत्रकार परिषदेमध्ये, सोलापूरकरसारख्या व्यक्तींना जाहीर गोळ्या घातल्या पाहिजेत. अफजलखानाची ही वृत्ती दिसेल तेथे ठेचून काढली पाहिजे, अशा भाषेत सुनावले होते. त्यानंतर सोलापूर यांचा राजीनामा आला आहे.

वादग्रस्त विधानामुळे राज्यभर तीव्र संताप

राहुल सोलापूरकर यांनी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेच्या विश्वस्त पदाचा दिलेला राजीनामा संस्थेने स्वीकारला आहे. सोलापूरकर यांनी नुकतीच एका युट्युब चॅनलला मुलाखत दिली होती. ज्यामध्ये त्यांनी दावा केला होता की, छत्रपती शिवाजी महाराज यांची अग्र्याहून झालेली सुटका ही त्यांनी लाच दिल्याने झाली होती. शिवाजी महाराज यांनी औरंगजेब आणि त्याच्या पत्नीलाही लाच दिली होती आण त्यानंतर त्यांची तेथून सुटका झाली, असे धक्कादायक विधान सोलापूरकर यांनी केले आहे. त्यानंतर राहुल सोलापूरकर यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर करत आपला खुलासा करण्याचा प्रयत्न केला आहे. (हेही वाचा, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात साजरा होणार शिवजयंती उत्सव; राज्यगीत, शिववंदना, पोवाडा गायनासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, घ्या जाणून)

राहुल सोलापूरकर यांचा खुलासा

इतिहासकार इंद्रजित सावंत यांच्याकडून सोलापूरकरांच्या वक्तव्याचे खंडण

इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी राहुल सोलापूरकर यांच्या विधानावर जोरदार आक्षेप घेत ते खोडून काढले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आजव उपलब्ध असलेल्या इतिहासामध्ये कोठेही अशा प्रकारचा उल्लेख नाही. त्यांनी लाच दिल्याचे कोठेच आढळत नाही. उलट आग्र्याहून त्यांची सुटका झाल्यानंतर जवळपास चार महिन्यांनंतर छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यात आले. त्यांच्यासाठी हा प्रचंड संघर्षाचा काळ होता. इतिहासात त्याचे दाखले आहेत. असे असतानाही केवळ महाराजांची बदनामी करण्याच्या हेतूने त्यांनी हे विधान केले आहे का? हे कळायला मार्ग नाही, असे इंद्रजित सावंत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राहुल सोलापूरकर यांनी हिरकणी बुरुजावरुनही वादग्रस्त भाष्य केले आहे. हिरकणीची कथा घडलीच नाही. केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचे मोठेपण लोकांना कळावे यासाठी हिरकणीची कथा रचली गेली, असा अजब दावा सोलापूरकर यांनीकेला आहे.