Represe (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या अधिक आहे. तर बुधवारी पुण्यातील जिल्हाप्रशासनाने खासगी कंपन्यांना एक सुचना दिली आहे. त्यानुसार खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा देण्यात आली आहे. परंतु जर कर्मचाऱ्यांनी या आदेशाकडे दुर्लक्ष केल्यास त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. प्रशासनाच्या नुसार, जर एखाद्या कंपनीने या आदेशाचे पालन न केल्यास त्यांच्या विरोधात कलम 188 अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.आजपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील खासगी कंपन्यांची पाहणी केली जाणार आहे. खासकरुन आयटी कंपन्यांतमध्ये स्थानिक महापालिकेकडून पाहणी केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर ज्या कंपन्या वर्क फ्रॉम होमचा आदेश पाळणार नाहीत त्यांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे. महापालिकेचा हा आदेश ज्या कंपन्यांसाठी लागू आहे ज्यांचे काम खरचं अत्यावश्यक नाही आहे. कॉल सेंटरमधील कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यांच्या कामाचे स्वरुप पाहता उपस्थिती लावता येणार आहे. अन्यथा कॉल सेंटर सुद्धा बंद ठेवण्यात यावेत असे ही नवल किशोर राम यांनी म्हटले आहे.(Coronavirus: उघड्यावर थुंकणाऱ्यांकडून तब्बल 1,07,000 हजार रुपयांचा दंड महापालिकेकडून वसूल)

 पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळेच प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा द्यावी असे आदेश दिले आहेत. पुण्यात बुधवार पर्यंत कोरोनाचे 19 रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यात अजून एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. सदर महिलेने फ्रान्स आणि नेदरलॅन्ड्स येथून प्रवास करुन भारतात दाखल झाली होती. याबाबत पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अधिकृत माहिती दिली होती.