प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

पुणे (Pune) महापालिका हद्दीत पुन्हा एकदा विकेंड लॉकडाऊन (Weekend Lockdown) सुरु झाला आहे. त्यामुळे शनिवार-रविवार अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा-सुविधा बंद राहणार आहेत. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Pune Mayor Murlidhar Mohol) यांनी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली. शहरात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. (Pune Unlock: पुणेकरांना दिलासा! 14 जून पासून कोविड निर्बंध होणार अधिक शिथिल; पहा काय सुरु काय बंद?)

पुणे मनपा हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आणि वेलनेस सेंटर हे शनिवार आणि रविवार पूर्णतः बंद राहतील. तर रेस्टॉरंट, बार, फूड कोर्टमधून शनिवार-रविवार केवळ पार्सल सेवा सुरु राहील, अशी माहिती मोहोळ यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

विकेंडला बंद असणाऱ्या सुविधा:

#अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने.

# मॉल्स.

# सलून.

# ब्युटी पार्लर, स्पा आणि वेलनेस सेंटर.

# रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट बंद. केवळ पार्सल सेवा सुरु.

मुरलीधर मोहोळ ट्विट:

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी हे आदेश जारी केले असून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर रात्री 10 वाजल्यानंतर कारणाशिवाय 5 किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पुढील आदेश जारी होईपर्यंत हे नियम लागू राहणार आहेत. दरम्यान, आजपासून पुण्यासह संपूर्ण राज्यभर 30-44 वयोगटातील लोकांसाठी लसीकरण सुरु होणार आहे.