![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2024/01/Water-Supply-380x214.jpg)
पुण्यामध्ये (Pune) 4 एप्रिल दिवशी काही भागात पाणी पुरवठा होणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. इलेक्ट्रिकच्या काही कामासाठी वारजे वॉटर ट्रीटमेंट प्लांट मध्ये काम केले जाणार आहे. परिणामी पुणे महापालिकाकडून (PMC) 4 एप्रिल दिवशी बाणेर, बालेवाडी, कोथरूड, कात्रज आणि विमाननगर भागात पाणीपुरवठा विस्कळीत होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पीएमसी पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरूद्ध पावसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'काही इलेक्ट्रिक आणि सिव्हिल काम असल्याने शहरात 4 एप्रिलला पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे.' No Water Cut In Pune: पुण्यात यंदा उन्हाळ्यात पाणी कपातीचं संकट नाही .
कोणकोणत्या भागात पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम?
पाषाण, बावधन, सुस रोड, सुतारवाडी, वारजे माळवाडी, काकडे शहर परिसर, महात्मा सोसायटी, बाणेर, बालेवाडी, कर्वेनगर, वारजे, कात्रज, कोंढवा, खादी मशिन चौक, लोहेगाव, विमाननगर, विश्रांतवाडी, येरवडा, धानोरी, खराडी, रामटेकडी, सोलापूर. रोड, कोरेगाव पार्क, फुरसुंगी आणि हडपसरचा काही भाग या ठिकाणी 4 एप्रिलला पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.
सध्या उन्हाचा वाढता कडाका पाहता पाणीसाठा कमी आहे. बाष्पीभवनाची प्रक्रिया वेगवान होत असल्याने पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. पुण्यात यंदा उन्हाळ्यात पाणी कपात केली जाणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे पण नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.