Pune Rains. | Representational Image. (Photo Credit: PTI)

मुंबई पाठोपाठ यंदा पुणे शहरात पाऊसाने अगदी धुमाकूळ घातला आहे. यावर्षी पुणे शहरातील अनेक भागात कोसळलेल्या मुसळधार पावासामुळे अनेक भागांतील जनजिवन विस्कळीत झालं.

आताही पुणेकरांसाठी एक धोक्याचा इशारा देण्यात असून पुढील 48 तास पुणेकरांसाठी महत्वाचे आहेत. कारण पुणे शहर आणि जवळील परिसरामध्ये पुढील दोन दिवस ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात तयार झालेल्या कयार चक्रीवादळाचा प्रभाव अद्याप कायम आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात शुक्रवारी मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

BMC चं मुंबईकरांना Pothole Challenge 2019! पालिकेच्या MyBMC Pothole FixIt App वर 'खड्डे दाखवा, 500 रुपये मिळवा'चं आव्हान

तसेच लक्षद्वीप आणि लगतच्या दक्षिण-पूर्व अरबी समुद्रावर ‘महा’ हे चक्रीवादळ तयार झाले आहे. तर दुसरीकडे म्हणजेच पश्चिम-मध्य अरबी समुद्रावर ‘कयार’ हे चक्रीवादळ अजूनही कार्यरत आहे. या सर्व गोष्टींच्या होण्याऱ्या प्रभावामुळे शुक्रवारी राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.