BMC चं मुंबईकरांना Pothole Challenge 2019! पालिकेच्या MyBMC Pothole FixIt App वर 'खड्डे दाखवा, 500 रुपये मिळवा'चं आव्हान
Mumbai pothole ridden roads. (Photo credits: PTI)

मुंबईला खड्डेमुक्त करण्यासाठी बीएमसी (BMC)  म्हणजेच मुंबई पालिकेने आता शहरातील नागरिकांसाठी Pothole Challenge 2019  हे नवं चॅलेंज आणलं आहे. 1 नोव्हेंबर पासून मुंबईत 'खड्डे दाखवा, 500 रूपये कमवा' असं चॅलेंज देण्यात आलं आहे. यामध्ये काही अटी आणि नियम आहेत. त्याची पूर्तता केली तरच तुम्हांला मुंबई शहरातील खड्डे दाखवा आणि कमवा या चॅलेंजमधून कमाई करता येणार आहे. मुंबई शहरात अनेक ठिकाणी खड्ड्यांत रस्ते आहेत की रस्त्यात खड्डे असा प्रश्न निर्माण व्हावा इतकी बिकट परिस्थिती आहे. दरम्यान मुंबईतील खड्ड्यांमुळे मागील चार महिन्यात अनेकांचा नाहक बळी गेला आहे. त्यामुळे आता नागरिकांच्या सहकार्यातून मुंबईतील खड्डे बुजवण्यासाठी पालिकेने ही नवी शक्कल लढवली आहे.

'खड्डे दाखवा 500 रूपये कमवा' चॅलेंजच्या अटी आणि नियम

  • मुंबईकरांना 'खड्डे दाखवा 500 रूपये कमवा' चॅलेंज मध्ये सहभागी होण्यासाठी खड्डा हा 1 फूट लांब आणि 3 इंच खोल असणं गरजेचे आहे.
  • तक्रार केल्यावर 24 तासात हा खड्डा बुजवला गेला तर पैसे मिळणार नाहीत.
  • MY BMC pothole fixlt या अॅपवर जाऊन त्या खड्यांची तक्रार करावी, त्यानंतर खड्डे दाखवा 500 रूपये कमवा या चॅलेंजमध्ये सहभागी होता येईल.

मुंबई शहराला खड्डेमुक्त करण्यासाठी पालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी पुढाकार घेऊन ही योजना बनवल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र विरोधकांकडून या योजनेच्या घोषणापासूनच खिल्ली उडवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी पालिकेने नवं अ‍ॅप लॉन्च करून खड्ड्यांची तक्रार नोंदवण्याची सोय करून दिली होती. नक्की वाचा: MyBMC Pothole FixIt अ‍ॅप च्या माध्यामातून आता मुंबईकर BMC कडे करू शकणार खड्ड्यांची तक्रार

BMC Tweet

ऑगस्ट 2019 मध्ये  मुंबईत केवळ 414 खड्डे असल्याचा दावा  पालिकेने केला होता. मात्र नागरिकांसह, सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधकांनी महापालिकेचा हा दावा चुकीचा असल्याचं म्हटलं होतं.