Pune: अवैध Pay & Park प्रकरणात कॅन्टोन्मेंट बोर्डातील कंत्राटदाराच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक
Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

पुणे (Pune) शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Crime Branch) शनिवारी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या (Pune Cantonment Board) कंत्राटदाराच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आणि अन्य दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, एका महिला वकिलाकडून जबरदस्ती पार्किंग फी गोळा केल्याच्या आरोपावरून या कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. पूना कॉलेजच्या (Poona College) समोरील पे-आणि-पार्क (Pay-and-park) जागेत गाडी उभी नसतानाही कर्मचाऱ्यांनी पार्किंग फी गोळा केली.

ही घटना 14 ऑक्टोबर रोजी घडली असून वकील सीमीन शेख (35) यांनी याप्रकरणी एफआयआर (FIR) नोंदवली आहे. या प्रकरणी भवानी पेठेतील सनी म्हेत्रे (32) आणि लोहेगाव येथील सागर बग्गन (33) यांना अटक करण्यात आली आहे. (हे ही वाचा: पुन्हा हादरले पुणे! कबड्डी खेळत असताना कोयत्याने वार करून अल्पवयीन विद्यार्थीनीची निर्घुण हत्या; दोघांना अटक)

चार जणांनी दोन गृहनिर्माण सोसायट्यांकडे जाणारे प्रवेश रस्ते अडवले आणि बॅरिकेड्स लावून त्यांना पे-एन-पार्कमध्ये रूपांतरित केले. मी ज्या सोसायट्यांमध्ये दुकान चालवते त्या सोसायटीच्या पार्किंग लॉट मध्ये माझी बाईक पार्क केली होती. संशयितांनी माझ्या वाहनासमोर बॅरिकेड लावून माझा मार्ग अडवला आणि पार्किंग फी ची मागणी केली, असे सीमीनने टाइम्ससोबत बोलताना सांगितले.

"मी पे-एन-पार्क जागेत माझी बाईक पार्क केली नाही म्हणून मी पार्किंग फी भरण्यास नकार दिला, परंतु संशयितांनी मला गंभीर परिणामांची धमकी दिली. त्यांनी माझ्या वाहनाची तोडफोड करण्याची धमकी दिली आणि माझ्या हातातून 200 रुपये हिसकावून घेतले आणि मगच मला जाऊ दिले. मी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली खंडणी, इतर आरोपांसह एफआयआर नोंदवला आहे. या संशयितांना गृहनिर्माण सोसायट्यांमधील रहिवाशांकडून आणि इतरांकडून पैसे उकळण्याची सवय आहे, " असे ती पुढे म्हणाली.

माहिती मिळताच आम्ही म्हेत्रे आणि बग्गनला अटक केली आहे आणि पुढील कारवाईसाठी त्यांना कस्टोन्मेंट पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे (युनिट I) उपनिरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली.

पे-एन-पार्क चालवण्यासाठी पुणे इस्टेट ऑफिसने पुणे सर्कलची जमीन पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे दिली आली. मी या घटनेबद्दल तपशील गोळा करेन आणि आमच्या कंत्राटदारावर कारवाई करण्याचा निर्णय घेईन, असे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार यांनी टाईम्सला सांगितले.