प्रातिनिधिक प्रतिमा pc File image

पुण्यातून (Pune) एक अत्यंत धक्कादायक आणि अस्वस्थ करणारी घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका व्यक्तीने आपल्या पत्नीला नग्न अवस्थेमध्ये नाचायला भाग पाडून त्याचा व्हिडिओ शूट केला आहे. या व्यक्तीने आधी पत्नीला ब्ल्यु फिल्म दाखवून अनैसर्गिक संभोग केला आणि त्यानंतर तिचा नग्न अवस्थेमधील व्हिडिओ शूट केला. पीडित महिलेने बुधवारी सोमवार पेठेतील समर्थ पोलीस ठाण्यात औपचारिक तक्रार (एफआयआर 185/23) नोंदवल्यानंतर समर्थ पोलिसांनी पतीविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (FIR) दाखल करून कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचे 2015 मध्ये लग्न झाले होते. तिच्या पती नेहमी तिला अश्लील व्हिडिओज दाखवून त्याप्रमाणे सेक्स करण्यास, तसेच अनैसर्गिक लैंगिक कृत्ये करण्यास भाग पडत असे. गेली अनेक वर्षे पिडीत महिला हा त्रास सहन करत राहिली.

मात्र जेव्हा त्याने तिला नग्न अवस्थेमध्ये नृत्य करण्यास भाग पाडले आणि या कृत्यांचे चित्रीकरण केले तेव्हा पिडीत महिलेला धक्काच बसला. तिने यावर आक्षेप घेतल्यावर पतीने हे लज्जास्पद व्हिडिओ ऑनलाइन शेअर करण्याची धमकी दिली. त्यानंतर महिला आपल्या माहेरी गेली. मात्र, तेथेही तिला पतीच्या जाचापासून तिला सुटका मिळाली नाही. ती घरात एकटी असल्याचे पाहून त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. (हेही वाचा: Pune Murder Case: पुण्यात आयटी कंपनीत काम करणारा बेपत्ता तरुणाचा कुजलेला अवस्थेत मृतदेह सापडला; मारेकरू अटकेत)

एकदा तर या विक्षिप्त व्यक्तीने पिडीत महिलेच्या बहिणीच्या कामाच्या ठिकाणी पत्र पाठवून, तिच्यावर सेक्स रॅकेटमध्ये सामील असल्याचा खोटा आरोप केला होता. आता महिलेच्या तक्रारीनंतर या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.