Pune: पुणे येथे आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. तर घरगुती आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली हा सर्व प्रकार सुरु होता. याबद्दलची माहिती मिळताच पोलिसांनी एक बनावट ग्राहकाला तेथे पाठवून या वेश्याव्यवसायाचा खुलासा केला. यामध्ये पोलिसांकडून 50 वर्षीय आणि एका 22 वर्षीय महिलेला अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.(पुणे येथे हायप्रोफाईल सेक्स रॅकेटवर पोलिसांची धाड, 4 तरुणींची सुटका)
कात्रज येथील एका घरात वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेव्हा त्यांनी एकाला बनावट ग्राहक तयार करुन त्या आयुर्वेदिक मसाज सेंटरमध्ये पाठवले. त्यानंतर मसाज सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरु असल्याची पुष्टी केल्यानंतर त्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली. यामध्ये दोघींना अटक करण्यात आली. तर 50 वर्षीय महिला ही पालघर येथील राहणारी असून 22 वर्षीय मुलीकडून ती वेश्याव्यवसाय करुन घेत असल्याचे समोर आले.
दरम्यान, या प्रकरणी दोघींना ताब्यात पोलिसांनी घेतले असून पुढील चौकशी केली जात आहे. तसेच या सेक्स रॅकेटमध्ये आणखी काही तरुणींचा सुद्धा समावेश आहे का या बद्दल ही अधिक तपास पोलीस करत आहेत.(Sex Racket in Mumbai: मुंबई सेक्स रॅकेट चालवणार्या 4 जणांना अटक; POCSO अंतर्गत कारवाई)
याआधी सुद्धा कोरेगाव पार्क जवळ एका स्पा मसाजच्या नावाखाली हायप्रोफाईल सेक्स रॅकेट सुरु होते. याबाबत पोलिसांना टीप मिळाली असता त्यांनी एका पोलिसाला बनावट ग्राहक बनवून त्या स्पा मध्ये जाण्यास सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून मसाज पार्लरवर धाड टाकली. यामध्ये 5 परदेशी तरुणींसह स्पा मसाज पार्लरचा मालक याला अटक केली होती.