पुणे येथे हायप्रोफाईल सेक्स रॅकेटवर पोलिसांची धाड, 4 तरुणींची सुटका
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

पुणे (Pune) येथील येरवडा परिसरात स्पाच्या नावाखाली हायप्रोफाईल सेक्स रॅकेट सुरु असल्याची महिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

मेराकी स्पा हा येरवडा येथील हयात रेजन्सी हॉटेलशेजारी असणाऱ्या प्लॅटिनम सेक्वेअर नावाच्या इमारतीमध्ये आहे. या स्पामध्येमसाजच्या नावाखाली सेक्स रॅकेट काही अनेक दिवसांपासून सेक्स रॅकेट सुरु होते. या स्पामध्ये तरुणींना पैशाचे आमीष दाखवून त्यांच्या कडून सेक्सचा गोरखधंदा करुन घेताला जात होता. याबद्दल पोलिसांना त्यांच्या गुप्तहेरांकडून माहिती मिळाली.(हेही वाचा-पुणे येथे Massage Centre मध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, आरोपीला अटक)

पोलिसांनी रविवारी या स्पावर धाड टाकत 4 तरुणींची सुटका केली आहे. तसेच स्पा चालविणाऱ्या महिलेवर पीटा अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.