Pune Schools Reopen (Photo Credits-ANI)

Pune Schools Reopen: कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) राज्यातील शाळा दहा महिन्यांहून अधिक काळ बंद होत्या. या दरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात होते. याच पार्श्वभुमीवर आजापासून पुण्यात शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. तर पुण्यात 5 वी ते 8 वी चे वर्ग सुरु झाले असून शाळेत खुप दिवसांनी परतलेल्या विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. कारण ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत असताना कंटाळा येत असल्याचे एका विद्यार्थ्याने म्हटले आहे.(पुणे: माध्यमिक शाळेत शिक्षक भरती घोटाळ्याचा प्रकार उघडकीस, आरोपींना अनुदानित पदावर भरल्याचे तपासात स्पष्ट)

पुण्यातील शाळेतील एका विद्यार्थ्याने आजपासून शाळा सुरु झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने असे म्हटले आहे की, शाळेत आल्यानंतर खुप बरे वाटले. कारण ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेताना कंटाळा येत होता. तसेच मित्रांपासून दूर असल्यासारखे वाटत होते. पण आता शाळा सुरु झाल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा भेटता येणार आहे.(SSC, HSC Exams 2021 मे महिन्यापूर्वी घेणे शक्य नाही- शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड)

Tweet:

दरम्यान, राज्यभर 5 वी ते 8वीचे वर्ग देखील सुरू झाले आहेत. परंतु शिक्षकांना त्यांचे आरटी पीसीआर टेस्ट रिपोर्ट्स देखील निगेटिव्ह असल्याचा दाखला सादर करावा लागणार आहे. पुढील टप्प्यांमध्ये आता 1ली ते 4 थी चे वर्ग देखील सुरू करण्याचा विचार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले होते.  परंतु मुंबई मध्ये मात्र अद्याप शाळा सुरू झालेल्या नाहीत.