येत्या काही दिवसांत राज्यात मान्सूनचे आगमन होईल. मात्र त्याआधी मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. हवामानात होणाऱ्या बदलांचा परिणाम राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशात पुण्यात मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यात आज विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. शहरातील अनेक भागात गारांसह मुसळधार पाऊस झाला. सांगवी, बाणेर येथील नागरिकांनी गारपीट पाहिली. सिंहगड रोड, एनडीए, खडकवासला, वारजे, नांदेड भागात सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. अशाप्रकारे सलग तिसऱ्या दिवशी पुण्यात मुसळधार पाऊस झाला. (हेही वाचा: Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट! पुढील आठवड्यात BMC 10 ते 15 टक्के पाणीकपात जाहीर करण्याची शक्यता)
Pune Rains-
#Raining heavily in #Pune ,#Punerains #पुणे pic.twitter.com/SxLQSnNVSw
— Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaiLY) June 1, 2023
#punerain Heavy rains near Pune University pic.twitter.com/M2ysJkHJrM
— Nilesh Hejib (@NileshHejib) June 1, 2023
Heavy rain with hailstorms were reported in several parts of the city. Residents of Sangvi and Baner witnessed hailstorms. IMD has predicted lightning and light to moderate rain in Pune for today.
Rainfall upto 17:30 , Shivajinagar 0.9 mm , Nimgiri 3.0 mm , Pashan 7.5 mm , Malin… pic.twitter.com/3k9Uk99aOJ
— Pune Mirror (@ThePuneMirror) June 1, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)