पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पहिल्याच सभेवर पावसाचे सावट; भाषण होणारच- कार्यकर्त्यांची भूमिका
Raj thackeray (Photo Credit: IANS)

विधानसभा निवडणूक 2019 (Assembly Election 2019) च्या पार्श्वभूमीवर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज पहिली सभा पुणे (pune) येथे पार पडणार आहे. राज ठाकरे यांच्या सभेवर पावसाचे सावट असले तरीदेखील सभा होणारच अशी कार्यकर्त्यांनी भूमिका मांडली आहे. सभेसाठी मनसेला मंगळवारी अखेर पुण्यात मैदान मिळाले आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून शांत असलेले राज ठाकरे या निवडणुकीत कोणता मुद्दा मांडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांची 'लाव रे तो व्हिडिओ' मोहिमेच्या माध्यमातून भाजपवर निशाणा साधला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ही मोहिम अपयशी ठरल्याचे दिसून आले होते.

विधानसभा निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे पुणे येथून त्यांच्या सभेची सुरुवात करणार आहेत. तसेच आज बुधवारी पुण्यातील सरस्वती शाळेच्या मैदानावरुन राज ठाकरे विधानसभेच्या प्रचाराचा श्रीगणेशा करणार आहेत. भाजपकडून या निवडणुकीत कोथरुड येथून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे या सभेत राज ठाकरे यांच्या रडारवर चंद्रकांत पाटील असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यात एकीकडे पावसाचे सावट दिसत आहे तर, दुसरीकडे मनसेचे आयोजक मात्र, सभा होणारच असे ठामपणे सांगत आहेत. हे देखील वाचा- शिवेसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या टीकेवर शरद पवार यांचा सवाल; ...मग पाच वर्षात शिवसेनेने काय केले? (Video)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने गेल्या लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. मात्र, लावरे तो व्हिडिओ मोहिमेच्या अंतर्गत राज ठाकरे यांनी भाजपच्या नाकी नऊ आणले होते.

पण प्रत्यक्ष मतदानात त्याचा फारसा फायदा झाला नसल्याचे दिसून आले होते.