Payal Rohatgi: अभिनेत्री पायल रोहतगी विरोधात पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल
Payal Rohatgi | (Photo Credit: Instagram)

अभिनेत्री पायल रोहतगी (Payal Rohatgi) हिच्या विरोधात पुणे (Pune) येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महात्मा गांधी आणि काँग्रेस परिवारातील व्यक्तींची बदनामी केल्याचा तिच्यावर आहोप आहे. पायल रोहतगी सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. सोशल मीडिया   प्लॅटफॉर्मवरुन तिने केलेल्या पोस्ट अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडतात. आताही तिच्यावर सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केल्या प्रकरणीच गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. पुणे काँग्रेसच्या सरचिटणीस संगीता तिवारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार पायल रोहतगी आणि तिचा व्हिडिओ तयार करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगीता तिवारी यांनी दिलेल्या फिर्यादीत महटले आहे की, महात्मा गांधी, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी व त्यांचे कुटंबिय, काँग्रेस परीवार यांच्याबाबत पायल रोहतगी हिने अपमानास्पद आणि खोटा तसेच बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केला आहे. संगिता तिवारी यांनी आपली फिर्याद सायबर पोलिसांकडे दिली आहे. सायबर पोलिसांनी ही तक्रार शिवाजीनगर पोलिसांकडे वर्ग केली आहे. (हेही वाचा, Armaan Kohli Arrested: अभिनेता अरमान कोहलीला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून अटक, घरातून हस्तगत केले कोकेन, आज न्यायालयात करणार हजर)

पायर रोहतगी हिने या आधीही काँग्रेस आणि नेहरु कुटुंबीयांवर मोठ्या प्रमाणावर टीका केली होती. या प्रकरणात तिला मागे अटकही झाली होती. सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करायची. प्रकरण पुढे न्यायालयात गेले की माफी मागून प्रकरणावर पडदा टाकायचा. त्यानंतर पुन्हा सोशल मीडियावर असेच काहीतरी वादग्रस्त टाकायचे असे पायर रोहतगी हिच्याकडून या आधीही घडल्याचे सांगितले जाते.