Pune: पाळीव प्राण्यांनी सार्वजनिक ठिकाणी विष्ठा केल्यास मालकाला भरावा लागणार 500 रुपये दंड, प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय
Dog | (Photo Credit - Twitter)

हल्ली प्रत्येकाच्या घरी पाळीव प्राणी असतो. पाळीव प्राणी असणं, भुतदया बाळगणं हे आहेचं. पण त्या प्राण्याची काळजी घेणं, त्याचा निट सांभाळ करणं हे देखील तेवढचं महत्वाचं आहे. लोक मोठ्या हौशीने पाळीव प्राणी पाळता, रोज त्यांना सकाळ-संध्याकाळ फिरायला घेवून जातात. दरम्यान प्राणी सार्वजनिक स्थळी, बागबगिचात, रस्त्यावर, फूटपाथवर घाण करुन ठेवतात. पण त्यामुळे आजुबाजुचा परिसर घाण होतो. विष्ठेचा वास पसरतो. इतर पादचाऱ्यांना ह्याचा त्रास होतो. त्यामुळे पुणे महापालिकेने यावर लक्ष केंद्रीत केले आहे. सार्वजनिक ठिकाणी पाळीव प्राणी फिरवायला आणल्यास आणि त्या प्राण्याने घाण केल्यास प्रशासन यावर कारवाई करणार आहे. त्यामुळे पाळीव प्राण्यांना फिरवताना मालकाने यापुढे सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन महापालिकेने (Pune Muncipal Corporation ) केले आहे. घनकचरा विभागाच्या बैठकीत याबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

 

पुण्यात (Pune) तुम्हाला घरी पाळीव प्राणी (Domestic Animal) पाळायचा असल्यास त्या प्रण्याची नोंद करणे बंधकारक केले आहे. म्हणजेच विना नोंदणी तुम्ही अधिकृतरित्या पाळीव प्राणी पाळू शकत नाही अशा सुचना पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation)  देण्यात आल्या आहे. यामधे पाळीव कुत्री (Dog) आणि मांजरांचा (Cat) समावेश आहे. तसेच या पाळीव प्राण्यांना तुम्ही बाहेर फिरायाला घेवून आल्यास आणि या प्राण्याने सार्वजनिक ठिकाणी विष्ठा केल्यास मालकाला दंड भरावा लागणार आहे. (हे ही वाचा:- Pune Viral Video: पुणे पीएमपीएमएल बस चालक आणि दुचाकीस्वारात बेदम हाणामारी, सोशल मिडीयावर व्हिडीओ)

 

बगिचा, रस्ते, फूटपाथ येथे पाळीव प्राण्यानी विष्ठा केल्यास पाळीव प्राण्याच्या मालकास तब्बल ५०० रुपये भरावे लागणार आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यस्थापनाला ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पाळीव प्राण्यांमुळे  सार्वजनिक ठिकाणी आणि उद्यानांमध्ये घेऊन येतात आणि त्यामुळे सर्वत्र घाण पसरते अशा तक्रारी महापालिकेकडे येण्याच प्रमाण वाढले आहे.  त्याच पार्श्वभुमिवर पुणे महापालिकेकडून हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.