पुणे: गुरुवार पेठे येथे गॅस सिलेंडरचा स्फोट, दुर्घटनेत महिला आणि मुलगा जखमी
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-Pixabay)

पुणे (Pune) येथील गुरुवार पेठे मधील (Guruwar Peth) शितळादेवी चौक इमारतीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना आज (30 एप्रिल) घडली आहे. या दुर्घटनेत एक महिला आणि मुलागा जखमी झाला आहे.

तर इमरतीतील तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या एका रहिवाश्यांचा घरात गॅस लिकेज झाला. परंतु घरातील मंडळींना याबद्दल कळले नसल्याने स्फोट झाला. त्यामध्ये आई (55) आणि मुलगा (30) हे दोघेजण भाजले आहेत. तसेच घरामधील सामनासुद्धा या आगीत जळाले असल्याचे दिसून येत आहे. परंतु घटनास्थळी तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचल्या आहेत. (गोरेगाव: धर्मा प्रोडक्शनच्या गोदामाला मध्यरात्री भीषण आग)

या आगीवर आता नियंत्रण आणले गेले असल्याचे सांगण्यात आले आहे. तर अद्याप कोणतीही जीवतहानी झाली नाही आहे.