Cama Industrial (Photo Credits-ANI)

गोरेगाव (Goregaon) येथील कामा इंडस्ट्रीमध्ये (Cama Industrial) मध्यरात्रीच्या 2.30 वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या मध्ये करण जोहर (Karan Johar) याच्या धर्मा प्रोडक्शनच्या (Dharma Production) गोदामाला भीषण आग लागली.

या दुर्घटनेत प्रोडक्शनमधील मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले आहे. परंतु कोणतीही जीवतहानी झालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी 12 अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना झाल्या होत्या. तर 5 तासांच्या प्रयत्नांनंतर आग्निशामन दलाला आग विझवण्यासाठी यश आले.(Mumbai Fire: माहिम येथील दुकानाला आग; आजच्या दिवसातील मुंबईतील आगीची दुसरी घटना)

मात्र आग नेमक्या कोणत्या कारणामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु याबद्दल अधिक तपास करण्यात येईल अशी माहिती अग्निशामन दलाकडून देण्यात आली आहे.