Mahim Shop Fire (Photo Credits: ANI)

Mumbai Fire: मुंबईतील माहिम येथील एका दुकानाला आग लागली असून अग्निशामक दलाच्या  3 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या आगीत कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. आजच्या दिवसातील मुंबईत आग लागल्याची ही दुसरी घटना आहे. (माटुंगा येथील 'बिग बाजार'ला भीषण आग; अग्निशामक दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी रवाना)

ANI ट्विट:

काही वेळापूर्वी माटुंगा येथील बिग बाजारला आग लागली होती. या आगीचे देखील कारण समोर आलेले नाही.