पुण्यातील (Pune) पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) मध्ये एका हॉस्पिटल जवळ आग भडकल्यानंतर वेळीच 19 रूग्णांना दुसरीकडे हलवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. ही घटना मंगळवार पहाटेची आहे. Max Neuro Hospital जवळ असलेल्या गोदामामध्ये आग भडकली आणि लगोलग हॉस्पिटलमध्ये हालचालींना वेग आला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाल्याची नोंद झालेली नाही.
पिंपरी चिंचवड मधील कासारवाडी भागात असलेल्या गोदामाला आग लागली. जय गणेश गोदामामध्ये प्रामुख्याने वापरलेले जुने टायर साठवलेले असतात. Max Neuro Hospital जवळ असलेल्या या गोदामाला पहाटे 2 च्या सुमारास आग लागली. आगीचं वृत्त समजताच अग्निशमक दल तातडीने हजर झाले. Fire Officer Rushikant Chipade यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, आगीचे लोळ गोदामामधून हॉस्पिटलच्या भिंतींकडे जात होते. जशी आग वाढत गेली तसा हॉस्पिटल मध्ये दाखल रूग्णांना त्याचा धोका वाढला. यामध्ये हॉस्पिटलच्या प्रॉपर्टीचे देखील नुकसान झाले. रात्रीच्या रात्री आग आटोक्यात आणण्यासाठी सुमारे 10 फायर टेंडर्स घटनास्थळी बोलावण्यात आले होते.
पहा आगीची दृश्य
#WATCH महाराष्ट्र: कल देर रात पुणे ज़िले के पिंपरी चिंचवाड़ के कसारवाड़ी इलाके में पास के टायर गोदाम में आग लगने के बाद सुरक्षा उपाय के तौर पर मैक्स न्यूरो अस्पताल से 19 मरीजों को निकाला गया। बाद में आग पर काबू पा लिया गया। pic.twitter.com/8lCDodWQrD
— ANI_HindiNews (@AHindinews) January 31, 2023
सुरूवातीला डिफेन्सिव्ह मोड मध्ये आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न झाले. तेव्हा 19 रूग्ण आणि हॉस्पिटलच्या अन्य कर्मचार्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. 5 च्या सुमारास आग नियंत्रणामध्ये आली. त्यानंतर पुन्हा आग भडकू नये यासाठी प्रयत्न झाले. नक्की वाचा: Fire in Kondhwa: पुण्यातील कोंढवा येथील पारगे नगर परिसरात 5 ते 6 गोदामांना आग, Watch Video .
हॉस्पिटलमधून बाहेर काढलेल्या 19 रूग्णांपैकी 12 जणांना यशवंतराव चव्हाण मेमोरिअल हॉस्पिटल आणि अन्य 3 जणांना आदित्य बिर्ला हॉस्पिटल मध्ये पाठवण्यात आले तर उर्वरित चार जणांना घरी पाठवण्यात आले.