Pune Ekvira Devi Temple: पुणे येथील कार्ला देवी मंदिरात भाविकांची तुफान गर्दी, कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन
Karla devi temple (Photo Credits-Facebook)

Pune Ekvira Devi Temple: राज्यात मंदिर, धार्मिक स्थळ सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. त्यानुसार कोरोनाचे नियम पालन करुनच भाविकांना प्रवेश दिला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अशातच पुण्यातील कार्ल्याच्या एकविरा देवीच्या दर्शनाला भाविकांनी तुफान गर्दी केल्याचे समोर आले आहे. अशातच ही गर्दी पाहता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण तर नाही ना असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे. ऐवढेच नव्हे तर मंदिरात भाविकांनी गर्दी केल्याने कोरोनाच्या नियमांची तेथे पायमल्ली झाल्याने यासाठी देवस्थान, पोलीस आणि प्रशासन सुद्धा जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.

सध्या नवरात्रौत्सव सुरु असल्याने भाविकांकडून देवीच्या दर्शनासाठी उत्सुक आहेत. परंतु कोरोनाचे नियम पाळत भाविकांना प्रवेश दिला जात आहे. मात्र एकविरा देवीच्या मंदिरात सर्वकाही उलट झाले असून सोशल डिस्टंन्सिंगसह अन्य नियम मोडल्याचे तेथे दिसून आले.(Navratri Celebration Guidelines: नवरात्रौत्सवासाठी ठाणे महापालिकेकडून गाइडलाइन्स जाहीर, 'या' नियमांचे करावे लागणार पालन)

दरम्यान, मंदिरात झालेली ही गर्दी पाहता कोरोनाचे नियम येथे पाळले जावेत यासाठी मंदिर, पोलीसांकडून उपाययोजना केल्या पाहिजे होत्या. परंतु तसे काहीच झालेले नाही. भाविकांच्या या गर्दीमुळे आता कोणते पाऊल उचलले जाईल हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

तर प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या गाइडलाइन्सनुसार, आरती, भजन, किर्तन आणि अन्य धार्मिक कार्यक्रम हे गर्दी न करता पार पडावे. त्याचसोबत कोरोनाच्या नियमांचे पालन करावे असे ही स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचसोबत महापालिकेने मंडळांनी गरबा ऐवजी रक्तदान शिबिर राबवावे असे ही म्हटले आहे. या व्यतिरिक्त देवीची मुर्ती 4 फूटांपेक्षा मोठी नसावी असे ही स्पष्ट करण्यात आले आहे.