नवरात्रोत्सव (File Photo)

Navratri Celebration Guidelines: उद्यापासून सर्वत्र नवरात्रौत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे हा सण सुद्धा अत्यंत साधेपणाने साजरा करावा असे आवाहन आधीच नागरिकांना प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अशातच आता ठाणे महापालिकेने नवरात्रौत्सवासाठी नियमावली जाहीर केली आहे. नवरात्रौत्सव 7 ऑक्टोंबर ते 15 ऑक्टोंबर पर्यंत साजरी केली जाणार आहे.(Ghatasthapana Wishes In Marathi: घटस्थापना व नवरात्रीच्या शुभेच्छा, WhatsApp Status, Facebook Messages शेअर करत आप्तांच्या दिवसाची करा मंगलमय सुरूवात)

महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी टाइम्स ऑफ इंडिया यांना सांगितले की, आम्ही सर्व मंडळांना त्यांनी भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची सोय करावी अशी विनंती केली आहे. मंडळात येऊन दर्शन घेण्यास पूर्णपणे बंदी असावी. तसेच गर्दी होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी. त्याचसोबत मंडप उभारणीसह ऑनलाईन दर्शनासाठी ठाणे महापालिकेकडून परवानगी घेणे आवश्यक असणार आहे. त्याचसोबत मंडळात फक्त पाच जणांना दिलेल्या वेळेत उपस्थितीत राहण्याची परवानगी असणार आहे.(Navratri Invitation Card Format in Marathi: नवरात्री दरम्यान 'माता की चौकी'चं आप्तांना, मित्रमंडळींना आमंत्रण देण्यासाठी WhatsApp Messages,Images)

गाइडलाइन्सनुसार आरती, भजन, किर्तन आणि अन्य धार्मिक कार्यक्रम हे गर्दी न करता पार पडावे. त्याचसोबत कोरोनाच्या नियमांचे पालन करावे असे ही स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचसोबत महापालिकेने मंडळांनी गरबा ऐवजी रक्तदान शिबिर राबवावे असे ही म्हटले आहे. या व्यतिरिक्त देवीची मुर्ती 4 फूटांपेक्षा मोठी नसावी असे ही स्पष्ट करण्यात आले आहे.