प्रियकराच्या (Boyfriend) प्रेमाचे गारुड मनावर पुरेपूर बिंबलेल्या एका प्रेयसीने (Girlfriend) पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad) येथे आत्महत्या (Suicide) केली. आत्महत्या केल्याचे पुढे आलेले प्राथमिक कारण अगदीच क्षुल्लक आहे. प्रियकर जेवण्यासाठी लवकर आला नाही म्हणून प्रेयसी असलेल्या महिलेने आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. सुलोचना नामदेव लेकुरवाड असे या महिलेचे नाव आहे. ती 30 वर्षांची होती. मुळची लातूर येथील असलेली सुलोचना विवाहीत होती. दोन वर्षांपूर्वीच तिच्या पतीने आत्महत्या केल्याने तिला वैधव्य प्राप्त झाले होते.
वैधव्य प्राप्त झाल्यावर सुलोचना कामाच्या शोधात पुण्याला आली. पहिल्या पतीपासून तिला चार मुली आहेत. सर्व मुली गावी शिक्षण घेतात. सुलोचना पुण्यात आल्यावर कामधंदा शोधत होती. शेवटी तिने घरकाम आणि स्वयंपाक करुन उदरनिर्वाह करण्याचा निर्णय घेतला. तिला तशी कामेही मिळत गेली. ती दररोज सकाळी आणि संध्याकाळी काम करत असे. दरम्यान, तिची एका व्यक्तीसोबत ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर हळूहळू मैत्रीत आणि पुढे प्रेमात झाली. हे ऋणानुबंध पुढे अधिकच वाढत गेले. तिच्या प्रियकराचे नाव समजू शकले नाही. (हेही वाचा, Sangli Mass Suicide: म्हैसाळमधील 9 जणांची आत्महत्या नसुन हत्याकांड, गुप्तधनाच्या कारणामुळं हत्या)
दरम्यान, सुलोचना आणि तिचा प्रियकर हे वेगवेगळ्या ठिकाणी राहात असत. मात्र, त्यांचे जेवण सोबतच होत असे. सुलोचना यांनी स्वयंपाक केला आणि त्या जेवणासाठी प्रियकराची वाट पाहू लागल्या. खूप वेळ वाट पाहूनही तो जेवणासाठी आलाच नाही. त्यामुळे संतापलेल्या सुलोचना यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे. पुढील तपास सुरु केला आहे.
अलिकडील काही वार्षांध्ये क्षुल्लख कारणांवरुन आत्महत्या करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. इतक्या क्षुल्लख कारणांमुळे लोक आत्महत्या का करत असावेत? हा मनोविश्लेशक आणि सामजाचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनाही पडलेला एक मोठा प्रश्न आहे. केवळ प्रोढ लोकच नव्हे तर तरुण आणि अल्पवयीन मुलेही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलताना दिसत आहेत. त्यामुळे सामाजिक चिंतेत वाढ झाली आहे.